"कृषी प्रबोध" परिचय व लेखमालेचा उद्देश.


"कृषी प्रबोध" या आमच्या ब्लॉग वर "इको ऍग्रो ग्रुप" – पुणे, आपले स्वागत करते. १९९७ पासून इको ऍग्रो ग्रुप मधील कंपन्या, विविध स्वरुपात शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. आर्थिक दृष्टया फायदेशीर, शाश्वत, पर्यावरणाची, जमीनीची कोणतीही हानी न करता, अधिक उत्पादन मिळवणे हे आजच्या शेतकऱ्यापुढे आव्हान आहे. कृषी मधील विविध विषयावरती केले जाणारे जागतिक संशोधन व त्या संदर्भाच्या आधारे शेतकऱ्याने स्वताच्या शेतीमध्ये कोणते बदल करावे याबाबत शास्त्रोक्त, व्यवहारीक, वास्तववादी माहिती देण्याच्या दृष्टीकोनातून हि लेखमाला सुरु करत आहोत. उत्तम सादरीकरण व जलद गतीने संपर्क, यासाठी इंटरनेट ब्लॉग या डिजिटल युगातील माध्यमाचा या लेखमालेसाठी आम्ही वापर करत आहोत.

जागतिक कीर्तीचे कृषीतज्ञ/शास्त्रज्ञ यांचे शोध निबंध, लेखामधील माहिती संकलीत करून रंगीत चित्र प्रतिमा, आलेख, कोष्टक, व्हिडीओ इत्यादीचा वापर करून शेतकऱ्यांना सहज, सोप्या भाषेत कळावी यासाठी "कृषी प्रबोध" हि लेखमाला आहे.

हि लेखमाला विशिष्ट पिकासाठी नसून, शेती शास्त्राच्या तत्वांवर आधारित असल्याने सर्वांसाठी उपयुक्त आहे.

लेखमालेत सादर केलेल्या माहिती / संकल्पनांवर वाचकांनी मनन, चिंतन करून त्या अमलात आणाव्यात / शेती मध्ये सुधारणा कराव्यात हा या लेखमालेचा उद्देश आहे. लेख आवडल्यास, आपल्या परिचयाच्या लोकांना सदर लेख पुढे पाठवून शकता.

कृषी प्रबोध या ब्लॉगमध्ये विविध विषयातील तज्ञ लेख प्रकाशीत करतील. आपण जर ब्लॉगला फॉलो (Follow) केले तर नवीन लेख प्रकाशीत होताच त्याची माहिती आपल्याला ई-मेल द्वारे प्राप्त होइल. लेखाबाबत प्रश्न / सूचना आपण ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता. 

हि लेखमाला शास्त्र व तंत्रज्ञानाशी एकनिष्ठ राहून लिहली आहे. यात कोणतीही कंपनी, व्यापारी उत्पादने, अथवा विशिष्ठ तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात नाही. 

 प्रकाशीत केलेल्या लेखातील विचार व माहिती हि वैयक्तिक लेखकाची असून प्रकाशक जबाबदार नाहीत.

आपले विनीत,

इको ऍग्रो ग्रुप, पुणे.


Comments