क्षारता: Na+,
K+, Ca2+, Mg2+and Cl− हे जमीनीत आढळणारे
नैसर्गिक क्षार आहेत. पाणी आणि मातीचे मिश्रण तयार करून विद्युत वाहकता तपासल्याने
क्षारता किती आहे हे कळू शकते.
क्षारातेमुळे होणारी थेट
नुकसान:
- जमीनीत जास्त क्षार असतात तेव्हा वनस्पतीला जमीनीतील पाणी खेचण्यासाठी अधिक शक्ती खर्च करावी लागते. अति क्षार असलेल्या ठिकाणी पाणी उपलब्ध असूनही पीक जळू लागते.
- जे क्षार जास्ती असेल त्याचे विषारीपणाचे लक्षणे वनस्पती वरती दिसतात. पानांवर जळ दिसते.
क्षारातेमुळे होणारी
अप्रत्यक्ष नुकसान:
- अन्नद्रव्य उचलण्यामध्ये अडथळे निर्माण होणे. उदा: पालाश जास्ती असल्यास, कॅल्शियम उचलता येत नाही, क्लोराईड जास्त असेल तर नायट्रेट नत्र घ्यायला अडथळा येतो इत्यादी. कमतरतेची लक्षणे पानांवरती दिसतात.
- मातीच्या कणांवरती कॅल्शियम व मॅग्नेशियमची जागा सोडियम घेते व त्यामुळे मातीच्या कणांचे एकत्रीकरण (aggregation) कमी होते. व त्यामुळे मातीच्या कणांची रचना बदलते, सच्छिद्रता कमी होते.
- सिंचनासाठी वापरायच्या पाण्याची गुणवत्ता: पाण्यामध्ये कोणते क्षार किती प्रमाणात विरघळले आहेत व त्याचा EC (विद्युत वाहकता) किती आहे.
- किती आणि कोणती खते वापरली आहेत: क्लोराईड व सल्फेट युक्त खतांचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे.
- सिंचन प्रणाली व पाण्याचे प्रमाण: जितके जास्त पाणी वापराल तितके अधिक क्षार जमीनीत जातात.
- जमीनीचा प्रकार, पाणी मुरण्याचा वेग, भूजल पातळी, उष्ण हवामान व पाण्याचा निचरा होण्याची क्षमता: या सर्वांचा क्षारतेवर परिणाम होतो.
धोका |
EC (dS/m) |
नाही |
< ०.७५ |
किंचित धोका |
०.७५ -१.५ |
मध्यम धोका |
१.५ -३.० |
तीव्र धोका |
>३ |
देश |
क्षारबाधित ओलिताखालील जमीन. (लाख हेक्टर) |
एकूण ओलिता पैकी क्षार बाधित क्षेत्र. (%) |
भारत |
७० |
१७% |
चीन |
६७ |
१५% |
पाकिस्तान |
४२ |
२६% |
अमेरिका |
४२ |
२३% |
उझबेकिस्तान |
२४ |
६०% |
इराण |
१७ |
३०% |
तुर्कमेनिस्तान |
१० |
८०% |
इजिप्त |
९ |
३३% |
वरील देशांची एकूण |
२८१ |
२१% |
एकूण जग |
४७७ |
२१ |
सर्वसाधारण शेतकरी प्रतिवर्षी प्रती हेक्टरी १ कोटी लिटर
पाणी पिकांना देत असेल तर, २ ते ५ हजार किलो इतके क्षार पाण्यामार्फत जमीनीमध्ये
देतो. या क्षारांचा निचरा झाला नाही तर हळूहळू जमीनीमध्ये भरपूर क्षारता वाढते.
क्षारतेचा परिणाम सर्व पीकांवरती सारखाच होत नाही. काही पिकं क्षारतेला संवेदनशील
असतात तर काही प्रतिकारक. तरी देखील पीक किती क्षारता सहन करू शकेल हे जमीनीच्या
प्रकारा वरती अवलंबून असते. सर्वसाधारणपणे सर्वाधिक क्षार सहन करण्याची
क्षमता वाळू > पोयटा > चिकणमाती या
प्रमाणे असते.
तपशील |
सलाईन जमीन |
सलाईन-सोडिक जमीन |
सोडिक जमीन |
EC (dS/m) |
> 4 |
> 4 |
< 4 |
SAR |
< १३ |
> १३ |
> १३ |
pH |
< ८.५ |
< ८.५ |
> ८.५ |
*SAR = Sodium Absorption Ratio.
*> More Than (पेक्षा जास्ती) *< Less Than (पेक्षा कमी)
SAR: Sodium Absorption Ratio - हे एक सिंचनाच्या पाण्याचे गुणवत्ता दर्शक मोजमाप आहे. विशेषकरून सोडियम बाधित जमीनी संदर्भात महत्वाचे आहे. यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या तुलनेमध्ये सोडियमचे प्रमाण किती आहे हे बघितले जाते.
संवेदनशीलता |
पाण्याचे SAR |
पीक |
अतिशय
संवेदनशील |
२-८ |
फळे, स्ट्रॉबेरी |
संवेदनशील |
८-१८ |
वाल वर्गीय
पीक, गाजर, मुळा, धने, पुदिना, द्राक्षे. |
मध्यम
प्रतिकारक |
१८-४६ |
भात, गहू,
भुईमुग, कांदा, बटाटा, वांगी, मिरची, सोयाबिन, डाळिंब, पेरू, बोर. |
प्रतिकारक |
४६-१०२ |
गहू, टोमाटो,
बीट, कापूस, पालक, राजगिरा, माठ. |
सलाईन आणि सोडिक जमीनिमध्ये सिंचन व्यवस्थापन:
- जमीनीचा निचरा सुधारण्यासाठी सच्छिद्र पाइप जमीनीमध्ये टाकणे व शेतात पाणी साठणार नाही अशा सर्व उपाय योजना करणे.
- भू-सुधारकांचा वापर: जिप्सम, गंधक, सल्फुरिक आम्ल इत्यादीचा शास्त्रोक्त पद्धतीने व पुरेश्या प्रमाणात वापर.
- भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचा वापर.
- सिंचनाच्या पाळ्यामध्ये योग्य अंतर ठेवणे.
- क्षारता न वाढवणाऱ्या खतांचा वपर करणे.
- २ ते ३ वर्षातून एकदा माती/ पाणी तपासणी.
सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा. नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
Comments
Post a Comment