पिकाच्या उत्पादन वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्य फवारणीचे महत्व व ती कशी वापरावीत. (लेख क्रमांक २४)

श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.
सदर लेख हा १९ जुलै २०१९ ला ॲग्रोवन दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झालेला आहे. 

पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्य फवारणीचे महत्व व ती कशी वापरावीत.

पानांद्वारे खतांचा पुरवठा:

शेतकऱ्यांना यापूर्वी कृषी खाते / शास्त्रज्ञा कडून टक्का यूरिया फवारणीची शिफारस केली जायची. गेले २५-३० वर्षांमध्ये विद्राव्य स्वरूपातील नत्र, स्फुरद, पालाश तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा वापर शेतकरी करत आहेत त्याचे चांगले फायदे मिळतात असा सर्वसामान्य समज आहे. या आधुनिक स्वरूपातील खतांचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल, कोणत्या उत्पादनापासून फायदा मिळू शकतो, तसेच ते कधी कसे वापरावे याबाबत शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सदर लेख दिला आहे. यामुळे अनेक गैसमज दूर होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल हि अपेक्षा.  

कोणत्याही पीक अन्नद्रव्याचा वापर (खर्च) करण्यापूर्वी त्याची नेमकी गरज कळणे आवश्यक आहे. यासाठी

  • . पिकावरती दिसणारी कमतरतेची लक्षणे
  • . माती परीक्षण अहवाल.
  • . पान देठांचे परीक्षण
  • . पिकाने त्या अन्नद्रव्याच्या वापराने  उत्पादन दर्जा यासाठी दिलेला प्रतिसाद. या चारही पद्धतींचा वापर करून नेमकी गरज ओळखावी निश्चित करावी.

पीक अन्नद्रव्य हि प्रामुख्याने पिकाच्या मुळावाटे घेतली जातात. मात्र ती पानांद्वारे देखील घेतली जाऊ शकतात. याबाबत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक तुके यांनी १९५० साली संशोधन करून पानांद्वारे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात हे सिद्ध केले. विद्राव्य स्वरूपातील खतांची उपलब्धतता वाढल्यामुळे, व्यावसायिक शेती पद्धतीमुळे तसेच तसेच फवारणी यंत्रातील सुधारणीमुळे या पद्धतीने खत सूक्ष्म अन्नद्रव्य सामान्यतः फवारली जाऊ लागली.

पानांद्वारे फवारलेल्या अन्नद्रव्यांमुळे मिळणारे फायदे.

  • . पिकाकडून जलद गतीने प्रतिसाद.
  • . मुळांवाटे उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्यापेक्षा १२ ते १०० पट अधिक अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होउ शकतात.
  • . नवीन भागामध्ये  किंवा वाढणाऱ्या फळामधील स्थिर असणाऱ्या अन्नद्रव्याची (कॅल्शिअम, गंधक, लोह, बोरॉन, तांबे) कमतरता टाळण्यासाठी हि पद्धत उपयुक्त आहे कारण वारंवार फवारणी करता येते.
  • . फळाच्या साली मधून सुद्धा प्रवेश होत असल्यामुळे फळांची गुणवत्ता वजन वाढू शकते.

तक्ता :  फवारणीद्वारे दिलेली अन्नद्रव्ये पानांद्वारे शोषणाचा कालावधी.

पोषक तत्त्वे

५०% शोषणासाठी लागणार वेळ / कालावधी

नत्र (यूरिया)

.- २ तास

स्फुरद

-१० दिवस

पालाश

१०-२४ तास

कॅल्शिअम

-२ दिवस

मॅग्नेशिअम

-५ दिवस

सल्फर

८ दिवस

झिंक

-२ दिवस

मॅंगेनिज

-२ दिवस

लोह

१०-२० दिवस

मॉलिब्डेनम

१०-२० दिवस













तक्ता पिकांमध्ये अन्नद्रव्यांची वहनशीलता

पोषण तत्वांची वहनशीलता

वनस्पतींमध्ये

जास्त वहनशीलता

नत्र,स्फुरद,पालाश, मॅग्नेशिअम (कमतरतेची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर दिसतात)

मध्यम वहनशीलता

सल्फर, तांबे, लोह, मॅंगेनिज,  मॉलिब्डेनम, झिंक  (कमतरतेची लक्षणे  प्रथम नव्या पानांवर दिसतात परंतु संपूर्ण वनस्पतीमध्ये त्वरीत पसरली जात नाहीत)

स्थिर घटक

बोरॉन, कॅल्शिअम (जुन्या पानातून / भागातून नवीन पानामध्ये जात नाही.















टीप: मुळांवाटे घेतलेले कॅल्शिअम हे फक्त पर्णरंध्र असलेल्या (बाष्पउत्सर्जन होणाऱ्या) भागापर्यंत पोहचते, त्यामुळे बहुतांशी फळांमध्ये याची कमतरता दिसून येते.

पानांद्वारे फवारलेली अन्नद्रव्य कोणत्या परिस्थितीत पिकाला उपलब्ध होउ शकतात?
  • ते पाण्यामध्ये विद्राव्य असले पाहिजे.
  • पानावरील मेणचट क्युटिकल (cutical) च्या थरांमधून आत शिरण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणजेच पाण्याचा अवरोध करणाऱ्या थरामधून जाण्याची क्षमता असली पाहिजे
  • क्युटिकल (cutical) चा थर पर्णरंध्र (Stomata ) यामधून शिरण्यासाठी त्याचा आकार अतिशय सूक्ष्म असला पाहिजे
क्युटिकलच्या मेणचट आवरणा मधून पानाच्या पेशीपर्यंतचा प्रवेश हा निष्क्रिय पद्धतीने (शक्ती खर्च पडता) होतो. द्रावणाची तीव्रता तसेच ते किती काळ पानावर राहते यावर पानांमधील अन्नद्रव्याचा प्रवेशाचा वेग अवलंबून असतो

जमिनीप्रमाणेच पानावर देखील धन आयन विनिमय क्षमता असते. सर्वसाधारण उपजाउ जमिनीचा धन आयन विनिमय क्षमता १०-२० m.e./ १०० g DM असते. याबाबत इटलीतील कॅथॉलिक युनिव्हर्सिटी चे प्राध्यापक फ्रीगोनी यांनी काम केले असून वाईनसाठीच्या द्राक्षवेल मधील पानांची धन आयन विनिमय क्षमता (६६.   m.e./ १०० g DM) म्हणजेच जमिनीपेक्षा - पट जास्ती आहे. याचा अर्थ पिके मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य पानवाटे घेउ शकतात.

तक्ता : विविध पिकांची पाने त्यांची धन आयन विनिमय क्षमता.

पाने

 धन आयन विनिमय क्षमता

गहू 

२१.

ओट्स 

२३.

लसूण घास

३६.

वाल इत्यादी

४३

टोमॅटो

५८.

द्राक्षवेल

६६.

पानांद्वारे सेंद्रिय तसेच असेंद्रिय घटक स्वीकारले जाउ शकतात. नत्र, स्फुरद, पालाश यांची एकूण गरज जास्त असल्यामुळे ती जमिनीद्वारेच जास्तीत जास्त प्रमाणात देणे योग्य ठरते. त्यांचा वापर तातडीची गरज भागवण्यासाठी केला जाऊ शकतो. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्याचा प्रभावीपणे उपयोग मात्र करता येतो.

पीकपोषक अन्नद्रव्ये विविध स्वरूपात उपलब्ध असतात मात्र  त्यातील सक्रिय घटक समप्रमाण असला तरी काही स्वरूपातील अन्नद्रव्ये पानांवाटे सहज प्रवेश करू शकतात लागू पडतात. याउलट काही स्वरूपातील अन्नद्रव्ये पेशींना इजा पोहचवून जळ सारखी लक्षणे दाखवतात. काही अन्नद्रव्ये तीव्र स्वरूपात वापरता येतात ज्यामुळे एक किंवा दोन फवाऱ्यात कमतरता भरून काढतात. काही सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबर हानीकारक जोड-घटक असतात ज्यामुळे  त्यांचा वापर नाजूक अवस्थेत करता येत नाही. अथवा त्यापासून पुढील दुष्परिणामाला तोंड द्यावे लागते.

फवारणीद्वारे खाते /सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरताना खताचे सॉल्ट इंडेक्स (Salt Index) तसेच त्यात जोड-घटक म्हणून नायट्रेट, सल्फेट, क्लोराईड उपस्थित असल्यास त्याचे प्रमाण माहिती असणे गरजेचे आहे.

सॉल्ट इंडेक्स (Salt Index)  मुळे परासरण दाब (ऑस्मॉटिक प्रेशर) वाढते. म्हणजेच सॉल्ट चे प्रमाण जास्ती असेल  त्या भागाकडे पाणी ओढले जाते तीव्र परिस्थितीमध्ये तेथील पेशी मृत होतात.

बाजारात मिळणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वेगवेगळ्या स्वरूपात, तसेच वेगवेगळ्या तीव्रतेत उपलब्ध असतात. अनेक वेळा ती चिलेटेड किंवा कॉम्पलेक्स्ड स्वरूपात असतात. चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीमधून देण्यासाठी उपयुक्त असतात. फवारणीसाठी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणे विशेष फायदेशीर ठरत नाहीविविध प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे तुलनात्मिक फरक खाली दिलेले आहेत.

सल्फेट स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये 

फायदे:

  • यामध्ये मूळ अन्नद्रव्य सल्फेट स्वरूपातील गंधक असतो.
  • सहज उपलब्ध / स्वस्त 

उणीवा:

  • स्थिरता आणि उपलब्धता पीएच वर अवलंबून
  • फायटोटॉक्सिसिटी होऊ शकते

क्लोराईड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये:

फायदे: सहज उपलब्ध / स्वस्त

उणीवा:

  • अयोग्यपणे प्रमाणात वापरल्यास फाइटोटोक्सिसिटी आणि स्कॉर्चिंग / बर्निंग होऊ शकते
  • उत्पादनाची गुणवत्ता, चव आणि टिकाउ क्षमता कमी होऊ शकते. 

नायट्रेट स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये:

फायदे:

  • जलद गतीने उपलब्ध / स्वस्त 
  • शाखीय वाढीच्या कालावधीमध्ये वापरण्यास योग्य. 

उणीवा:

  • फळ वाढीच्या कालावधीमध्ये वापरल्यास दुष्परिणाम होऊ शकतात
  • अतिरिक्त नत्रामुळे पाने लुसलुशीत बनून कीड / रोगांना आमंत्रण ठरू शकते.

ईडीटीए (EDTA) वापरून बनवलेली सूक्ष्म अन्नद्रव्ये:

उणीवा:

  • ईडीटीए रेणूचा आकार मोठा असल्याने वनस्पतींमध्ये पानावाटे प्रवेश करण्यासाठी कठीण
  • जैव विघटनशील नाही
  • चिलेटेड लोहाची स्थिरता पीएच वर अवलंबून
  • एक धातू सोडून दिल्यावर आणि दुसरा पकडने अनिवार्य उदा: झिंक EDTA मधील झिंक पिकाला सोडला कि EDTA रेणू कॅल्शिअमला धरते.
  • फवारणीसाठी योग्य नाही
  • काही वनस्पतींमध्ये EDTA रेणू ने फाइटोटोक्सिसिटी होऊ शकते
  • धातू EDTA रेणूला घट्टपणे बांधले जाते
  • तुलनेने कमी प्रमाणात धातू चिलेट केले जाऊ शकतात
  • महाग / खर्चिक
  • जमिनीमध्ये धातू उपलब्ध स्थितीमध्ये मुळांपर्यंत पोहचण्यासाठी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरली जातात. चिलेटेड उत्पादने परिणामकारक होण्यासाठी त्यामध्ये धातू चिलेटिंग एजन्ट (EDTA) योग्य प्रमाणात घेऊन प्रक्रिया केली पाहिजे. त्यामध्ये १००% चिलेशन हि प्रक्रिया झाली तरच त्या धातूचा संयोग जमीनीतील स्फुरद, लोह, कॅल्शिअम इत्यादीशी होत नाहीमात्र चिलेशन ची टक्केवारी १००% आहे का नाही हि चाचणी आपल्या खत प्रयोगशाळांमार्फत केली जात नाही.

लिग्नोसल्फेट ने कॉम्पलेक्स्ड सूक्ष्म अन्नद्रव्ये:  

फायदे:

  • सहजपणे उपलब्ध
  • जैव-विघटनशील 

उणीवा:

  • चिलेशन मध्ये धातूला घट्टपणे जखडून ठेवले जाते. याउलट कॉम्प्लेक्सिग या प्रक्रियेमध्ये धातू सेंद्रिय पदार्थांशी सैल रीतीने जोडला जातो
  • तुलनेने कमी प्रमाणात धातू १००% कॉम्पलेक्स केले जाऊ शकते
  • महाग/ खर्चिक 

अमिनो सिड  ने कॉम्पलेक्स्ड सूक्ष्म अन्नद्रव्ये:

फायदे: जैव विघटनशील

उणीवा:

  • धातूशी कमकुवतपणे बांधले/जोडले जाते.
  • चांगल्या गुणवत्तेसाठी कमी वजनाचे रेणू असणारे ग्लाइसीन अमिनो ॲसिड वापरावे लागते.
  • बऱ्याच उत्पादनांमध्ये प्रोटीन हायड्रोलाइसेट आणि धातू यांचे मिश्रण असते. जे तितकेसे उपयुक्त नाही.
  • तुलनेने कमी प्रमाणात धातू १००% कॉम्पलेक्स केले जाऊ शकते
  • महाग/ खर्चिक 

कार्बॉक्सिलिक ऍसिड / हेप्टाग्लुकॉनिक ऍसिड ने कॉम्पलेक्स्ड सूक्ष्म अन्नद्रव्ये:

फायदे:

  • जैव विघटनशील
  • विम्ल सामूमध्ये पूर्णपणे स्थिर
  • कमी वजनाचे रेणूमुळे वनस्पतींमध्ये खनिज द्रव्यांचे सुलभ स्थलांतर

उणीवा:

  • तुलनेने कमी प्रमाणात धातू १००% कॉम्पलेक्स केले जाऊ शकते
  • महाग/ खर्चिक 

नवीन तंत्रज्ञानानें बनलेली ऑक्सिइड / कार्बोनेटेहायड्रॉक्साईड या स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्ये:

फायदे:

  • उच्च प्रमाणात सक्रिय घटक, त्यामुळे कमी वापरावे लागते
  • पिकांना तात्काळ आणि दीर्घकालीन पोषण प्रदान करते
  • कमी मात्रा त्यामुळे तुलनेने स्वस्त
  • इतर पोषक तत्वांचा वापर करण्यास हस्तक्षेप किंवा अडथळा आणत नाही
  • वनस्पती पेशींना फाइटोटोक्सिसिटी आणि स्कॉर्चिंग / बर्निंग होत नाही.
  • क्लोराइड, सल्फेट्स, नायट्रेट्स यासारखे फाइटोटोक्सिक अशुद्धता या मध्ये नाही.
  • विशिष्ट कमतरतेसाठी एकल पोषक तत्व
  • पानांवर चिकटून राहते. 

सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीची योग्य वेळ पद्धत.

  • सूक्ष्म अन्नद्रव्य उत्पादन वाढ क्षमतेच्या कालावधीमध्ये वापरली जावीत. ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे तीच दूर करणे फायदेशीर ठरते. नको असलेली अथवा मिश्र अन्नद्रव्यांचा वापर कमतरता अचूकपणे दूर करू शकत नाही पुरेसा फायदा देउ शकत नाही.
  • फवारणी करताना पिकांवर पाण्याचा ताण नसावा.
  • शक्यतोवर फवारा पानांच्या दोन्ही बाजुंनी बसला पाहिजे.
  • फवारणीची सर्वोत्कृष्ट वेळ पहाटे - अथवा सायंकाळी उशिरा, हवेतील आद्रता जास्तीत जास्त असताना करावी.
  • उष्ण आणि कोरडे हवामान (तापमान ३० से. पेक्षा जास्त) असताना फवारणी करू नये.
  • हवा शांत असताना फवारणी करावी.
  • पाने ओली व्हावीत पण द्रावण ओघळून जाउ नये एवढेच पाणी वापरावे.
  • उत्तम दर्जाचे सुपर स्प्रेडर / सुपर पेनीट्रेण्ट चा वापर ताम्र सोडून इतर सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी करणे फायदेशीर ठरते.
  • योग्यवेळी + योग्यप्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी हि अयोग्य वेळ + दुप्पट मात्रा यापेक्षा अधिक परिणामकारक ठरते. 

वरील माहितीच्या आधारे, शेतकऱ्यांनी खरेदी करण्यापूर्वी सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रकारानुसार तसेच त्यांच्या गुणधर्मांनुसार मिळणारे लाभ अथवा त्यातील उणीवा यांचा अभ्यास करून निवड करावी. त्यांचा योग्य वेळी / परिस्थितीत वापर करावा म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त फायदा मिळेल.

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments