सर्वोत्कृष्ट द्राक्षासाठी ESS 80 SR 14 GB इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर वापरण्याची योग्य पद्धत (लेख क्रमांक २९)
प्रति एकर पाणी + औषध हे सर्वसाधारणपणे ४०
लिटर असावे. (गल्लीच्या अंतरानुसार यात थोडा फरक पडतो*)
कुबोटा कंपनीचे २४२०, २४४१ व २७४१ या मोडेलसाठी, ट्रॅक्टरच्या किती RPM ला, कोणत्या गियरमध्ये, प्रतितास वेग किती असतो व त्यानुसार गल्लीच्या अंतराप्रमाणे प्रेशर किती ठेवायचे याबाबत तक्ते प्रत्येक ESS मशीन ग्राहकाला दिलेले आहेत. या तक्त्यांचा वापर करून अतिशय अचूकपणे फवारणी करता येते. त्यासाठी बागेचे क्षेत्रफळ अचूक काढले पाहिजे व मोजून मापून पाणी (औषध) तयार करणे आवश्यक आहे.
क्षेत्रफळ काढण्याची पद्धत :
- एक एकर = ४३,५६० चौरस फूट
- समजा बागेमध्ये ९ x ५ फूट या अंतराची लागवड आहे.
- म्हणजेच ९ X ५ = ४५ चौरस फूट.
- म्हणजेच ४३,५६० भागिले ४५ = ९६८ वेली एक एकर मध्ये बसतात.
- ज्या बागेचे क्षेत्रफळ काढायचे आहे, त्या बागेतिल ओळी व एका ओळीतील वेलींची संख्या मोजून घ्यावी. अचूकपणे फवारणी करण्यासाठी हे आवश्यक आहे.
- समजा फवारणी करण्याच्या बागेमध्ये १६७० वेली या ९ X ५ फूट अंतरावर लागवड केलेल्या आहेत. तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? तर १६७०/९६८ =१.७२५ एकर
- म्हणजेच, एकरी ४० लिटर पाणी या प्रमाणे १.७२५ एकर साठी (१.७२५ x ४० = ६९) लिटर पाणी उडवावे लागेल.
- क्षेत्रफळ निश्चित झाल्यावर आपल्याला योग्य प्रमाणात पाणी व औषध घेता येते.
पाण्याचा पंप कोरडा फिरु नये, यासाठी ESS मधील टाकीमध्ये २ लिटर पाणी शिल्लक
राहीले पाहिजे. म्हणजेच वरील १.७२५ एकरच्या प्लॉट साठी ६९ + २ = ७१ लिटर पाणी घ्यावे
लागेल.
अचूकपणासाठी, या जास्तीच्या पाण्यासाठी वापरायचे औषधाचे प्रमाण काढणे सुद्धा आवश्यक
आहे. उदा: प्रति एकर ६ ग्रॅम GA / वापरायचा असेल तर असे त्रैराषिक मांडावे :
- ४० लिटर पाणी = ६ ग्रॅम GA
- ४२ लिटर पाणी = ६.३ ग्रॅम GA घ्यावा
क्षेत्रफळ अचूक मोजणे व त्या क्षेत्राफळासाठी किती पाणी लागेल हे अचूकपणे काढणे अत्यंत गरजेचे आहे.
ESS ने उत्तम फवारणी साधण्यासाठी खालील महत्वाच्या बाबीं
लक्षात घ्याव्यात.
ESS ने फवारणी करताना नोझल पासून सगळ्यात जवळचे पान / घड यातील अंतर किमान दोन फूट असावे लागते. फवारा नीट पसरण्यासाठी इतके किमान अंतर आवश्यक आहे. कमाल अंतर ५, ६ किंवा ७ फुट असले तरी चालू शकते. हे दोन पद्धतीने साध्य करता येते.
- फवारणी यंत्र हायड्रोलिक पट्ट्याद्वारे वर खाली करता येते. हायड्रोलिक पट्ट्या वर / खाली करून नोझल ते घड / पान हे अंतर हे किमान २ फुट ठेवता येते. असे करताना टॉपलिंक अॅडजस्ट करून मशीन जमिनीला समांतर ठेवणे गरजेचे आहे.
- दोन्ही बूम ज्या प्लेटवर बसवले आहेत त्या बॅकप्लेटचे ४ नट काढून आख्खी प्लेट खाली करता येते. या पद्धतीनेसुद्धा नोझल ते घड / पान हे अंतर किमान २ फुट ठेवता येते.
ESS यंत्रावरील दोन नोझलमधील अंतर सेट करणे.
अमेरीकन ESS
80SR मधून निघणारा फवारा हा फक्त १५0 ते १८0 इतकाच पसरतो. म्हणजेच कॅनोपीच्या मर्यादित भागासाठी 1 नोझल वापरले जाते. म्हणूनच ESS स्प्रेयरला १४ नोझल वापरले जातात. कॅनोपीमधील
सर्व
भागाला या प्रत्येक नोझलचा फवारा सम प्रमाणात दिला पाहिजे. प्रत्येक नोझलमधून उडालेला फवारा कॅनोपिमध्ये दुसऱ्या नोझालच्या समीप
यावा परंतू एकमेकांमध्ये मिसळू नये अशा पद्धतीने नोझल अॅडजस्ट करावे.
गल्लीचे अंतर व कॅनोपीचा विस्तार यानुसार नोझल व्यवस्थित अॅडजस्ट करण्यासाठी, प्रत्येक नोझल ज्या स्टील एल्बो वर बसवले आहे त्याचे दोन नट थोडा सैल करून नोझल अॅडजस्ट करता येते. उत्तम रिझल्ट साठी हे प्रत्येक बागेनुसार करणे गरजेचे आहे.
बागेमध्ये फवारणीची तयारी:
अ. अनेक औषधे एकत्र करण्याचा मोह निश्चित टाळावा.
(विशेषकरून GA सोबत बुरशी नाशके व सूक्ष्म अन्नद्रव्ये)
अ. प्रथम आर्धी टाकी पाणी भरून, मग औषधे टाकावीत. पावडर
स्वरुपाची औषधे प्रथम बादली मध्ये थोड्या प्रमाणात विरघळून घेऊन, गाळून
मगच टाकीत भरावीत. Mixer ने ढवळण्याची क्रिया, म्हणजेच PTO चालू करून उरलेले
पाणी भरावे. हे नेहमीच मोजून मापून अचूक करावे.
बागेमध्ये फवारणी करताना:
- ट्रॅक्टर व यंत्र बागेच्या १० फुट बाहेरून सुरु करावे. यामुळे सुरवातीच्या वेलीपासून पूर्ण प्रेशर ने उत्तम फवारा बसतो.
- शक्यतो एक आड एक ओळ या पद्धतीने फवारणी करावी.
- ट्रॅक्टर वळवण्यास पुरेशी जागा असल्यास, ट्रॅक्टरचा वेग कमी न करता, बूमचा फवारा बंद न करता, क्लच / ब्रेक न वापरता पहिल्या गल्लीमधून तिसऱ्या गल्लीमध्ये वळावे.
- जागा अपुरी असल्यास, बूमचा फवारा बंद करून, ट्रॅक्टर मागे / पुढे करून वळवून घ्यावा. ट्रॅक्टर व यंत्र शक्य तितके मागे नेऊन फवारणी चालू करावी.
- एकाच वेगाने ट्रॅक्टर चालवत, संपूर्ण बागेची फवारणी करावी. काही अपरिहार्य कारणामुळे बागेमध्ये फवारणी बंद करायची झाल्यास, प्रथम बूमचे नळ बंद करून फवारा बंद करावा. परत फवारणी चालू करताना, ज्या ठिकाणी फवारणी बंद केली तेथून १० ते १२ फुट मागे जाऊन फवारणी चालू करावी.
- अर्धी ओळ फवारायची गरज असेल तेथे, यंत्राचा एक बाजूचा बूम बंद करून फवारणी करावी.
- मुद्दामून बागेच्या कडा मारणे आवश्यक नाही.
- प्रत्येक बुमवरील नोझलचा फवारा कॅनोपी मधील क्षेत्रापुरताच जाईल याची खात्री करावी. (कॅनोपीच्या बाहेर, खाली / वर अथवा पलीकडील ओळीवर फवारा जाऊ नये)
- GA हे स्पर्श्यजन्य क्रिया असलेले रसायन आहे. जास्त आद्रता असताना याची उपलब्धता चांगली होते, म्हणूनच जास्तीत जास्त आद्रता मिळण्यासाठी, GA चा फवारा संध्याकाळ ते पहाट या कालावधीमध्ये करण्याची आम्ही शिफारस करतो. डेल्टा मीटरचा वापर करून "डेल्टा T" म्हणजेच फवारणीची सुयोग्य वेळ कळते. "डेल्टा T" म्हणजे तापमान व आर्द्रतेच गुणोत्तर आहे, ते अंदाजाने काढता येत नाही. म्हणून डेल्टा मीटर चा वापर अवश्य करावा. जास्त व दीर्घकाळ आर्द्रतेसाठी GA ची फवारणी रात्री केली जाते. याचा अर्थ GA अंधारात फवारावे असा नाही. काही ठिकाणी / काही वेळा दुपारी सुद्धा "डेल्टा T" उत्तम असतो (२ ते ८). अशा वेळेस फवारणी करायला हरकत नाही. डेल्टा T हा १० च्या वर असल्यास फवारणी करू नये.
- दव पडण्याच्या तीन तास आधी फवारणी घेण्यास हरकत नाही.
डेल्टा मीटर:
- "डेल्टा T” चे मोजमाप २ पासून चालू होते.
- फवारणीची उत्तम वेळ (“डेल्टा T”) खालील प्रमाणे आहे.
- २ ते ६ : “डेल्टा T” सर्वोत्कृष्ट.
- ६ ते ८ : “डेल्टा T” उत्तम.
- ८ ते १० : शक्य असल्यास फवारणी टाळावी.
- १० च्या वरती : फवारणी मुळीच करू नये.
- टीप: डेल्टा T”, हवेचा वेग यांच्या नोंदी प्रत्यक्ष शेतामध्येच फवारणी पूर्वी घ्यायच्या असतात.
नोझल चार्ज मोजणे (हे प्रत्येक फवारणी पूर्वी करायचे आहे )
ॲल्युमीनियम पट्टी जोडलेली लाल वायर, मीटरच्या RED लिहलेल्या पोर्टमध्ये घालावी, काळी वायर Black लिहलेल्या पोर्टमध्ये. मध्य भागातील खटका आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे २०० लिहिलेल्या आकड्यासमोर ठेवावा.
मल्टीमीटरने चार्ज कसा मोजावा:
फवारा चालू असताना लाल रंगाच्या वायरला जोडलेली पट्टी हि नोझलच्या १ इंच वरती पकडून काळी वायर हि नोझलच्या खालच्या बाजूस अर्थिंग साठी एखाद्या नटावर अथवा स्वच्छ लोखंडी भागावर ठेवावी. त्यानंतर मीटरवर चार्ज मोजावा. (वर दाखवल्या प्रमाणे मीटर चालू करणे).
नोझल चार्ज हा ९ mA च्या पुढे असेल तर उत्तम चार्ज आहे. याचा अर्थ १५, २० अथवा २५ असा चार्ज दिसत असेल तर सदर नोझल अधिक कार्यक्षम आहे असे मात्र नाही.
जर नोझल चार्ज ९ पेक्षा कमी दाखवत असेल तर, नोझल साफ नाही
/ त्यामध्ये कचरा आहे. अशा वेळेला नोझल साफ
करणे गरजेचे आहे.
टीप: अमेरिकन ESS 80 SR 14 GB ने द्राक्षांसाठी PGR फवारणी वेळापत्रक. (लेख क्रमांक ८) पाहावा.
सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात
या चौकटीवर क्लिक आहे, त्यावर क्लिक करा. नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
Thank you very much Ravindra. You have given very nice information to the Grape farmers. Using the Electrostatic Sprayer by efficient way and saving of PGR / HIGH VALUE MOLECULES. This ESS 80 SR may be useful in hi Density fruit orchards also.
ReplyDeleteDr. Anil Kamble