पेस्टीसाईडची कार्यक्षम फवारणी (लेख क्रमांक ३५)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.

कीटक/बुरशी/तण (या शिवाय अष्टपाद, उंदीर, गोगलगाय, सुत्रकृमी, विषाणू इत्यादी) चे नियंत्रण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना एकत्रपणे पेस्टीसाईड असे संबोधले जाते. कीड-रोग व्यवस्थापनात पेस्टीसाईडचा वापर महत्त्वाची भूमिका बजावते. यशस्वी कीड-रोग नियंत्रणासाठी योग्य पेस्टीसाईडची निवड, पेस्टीसाईड वापराचे योग्य तंत्र तसेच पेस्टीसाईड वापरण्यासाठी उपयोगात आणलेले उपकरण तिन्ही महत्वाचे आहे. कीड-रोगाचे यशस्वी निवारण करण्यासाठी निव्वळ पेस्टीसाईडची फवारणी उपयोगी नसून कीड-रोग व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान असणेहि गरजेचे आहे.  

पेस्टीसाईड वापर तंत्राचा मुख्य उद्देश हा कमीतकमी प्रयत्नात जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कीड-रोग नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य साध्य करणे, व हे करताना लक्ष्य नसलेल्या इतर सजीवांना कमीत कमी अथवा शून्य हानी होईल याची काळजी घेणे. बहुतांश पेस्टीसाईडस विषारी आहेत आणि ते सजीवांना व पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे त्यांचा वापर अत्यंत विवेकपूर्ण असावा.

नियंत्रणासाठी कीड/रोग यांचे जीवन चक्र, त्यांची संवेदनशील अवस्था, त्यांच्या अधिवासाच्या / लपण्याच्या जागा, उडण्याची व हालचाल करण्याची क्षमता, योग्य पेस्टीसाईडची निवड, फवारणीची योग्य वेळ या बाबत माहिती असणे गरजेचे आहे.

यशस्वी कीड-रोग नियंत्रणासाठी खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे: 

कीटक समस्येचे ज्ञान:

1.       कीटकांचा अधिवास कोठे आहे?

लक्ष्य निश्चित करण्यासाठी

2.       नियंत्रणासाठी सर्वात संवेदनाक्षम अवस्था कोणती आहे?

फवारणीची योग्य वेळ ठरवण्यासाठी

3.       कीटकांची उडण्याची व हालचाल करण्याची क्षमता

किती कव्हरेज आणि थेंबांचा आकाठरवण्यासाठी

पेस्टीसाईडचे ज्ञान:

4.       पेस्टीसाईडची कार्य पद्धती, प्रसार कोणता आहे?

फवारणीचे तंत्र ठरवण्यासाठी.

5.       फायटोटॉक्सिसिटी आहे का?

कॅलिब्रेशन आवश्यकता ठरवण्यासाठी

6.       पेस्टीसाईडचा विषारीपणा?

हाताळणी मध्ये आवश्यक खबरदारी घेण्यासाठी. तसेच मित्र कीटक, मधमाशी इत्यादी साठी ते हानिकारक नाही ना ?

 

पेस्टीसाईडस विषारी असून कमी मात्रेत वापरावी लागतात, त्यामुळे त्यांचे वनस्पतीच्या सर्व भागांवर सम प्रमाणात वितरण होण्यासाठी माध्यम वापरायची गरज पडते.

१ एकर वर वाढणाऱ्या वनस्पतीचा त्रिमितीय क्षेत्रफळ अवाढव्य असते. त्यामुळे यांत्रिकी स्प्रे यंत्राचा वापर करताना, योग्य तितक्या पाण्याचा वापर, योग्य आकारच्या थेंबाची निर्मिती महत्वाची आहे, तरच पेस्टीसाईड वनस्पतीच्या जमिनीवर वाढणाऱ्या सर्व भागावर सम प्रमाणात वितरीत होते.  

यशस्वी फवारणी हि विविध उद्दीष्ठांचा समतोल साधण्यासाठी केलेली कसरत व परस्पर विरोधी घटकांमधील तडजोड असते.

A.     उत्तम कवरेज साठी कॅनोपी मध्ये जास्त थेंबांची उपलब्धी आवश्यक असते. थेंबांचा आकार लहान असेल तरच ते शक्य आहे. लहान थेंबांचे  वैशिष्टय:

a)      पानाच्या खालच्या व वरच्या पृष्ठभागापर्यंत जास्ती कवरेज.

b)      कमी पाण्यात फवारणी.

c)       पानावरती पडलेले थेंब एकमेकांवरती मिसळून वाहून जात नाही.

d)      कॅनोपी मध्ये सर्वदूर प्रवेश.

e)      फवारणी जास्त रुंद भागावर करता येते.

f)       अधिक परिणामकारक / असरदार फवारणी

g)      बारीक थेंब हवेबरोबर जास्त प्रमाणात उडून जातात / नको तिथे पडतात. (पेस्टीसाईड ड्रिफ्ट जास्त)

B.      आकाराने मोठ्या थेंबांचे वैशिष्टय:

a)      पानाच्या खालच्या पृष्ठभागापर्यंत कमी कवरेज.

b)      फवारणीसाठी जास्त पाणी लागते..

c)       पानावरती पडलेले थेंब एकमेकांवरती मिसळून वाहून जातात.

d)      कॅनोपी मध्ये सर्वदूर प्रवेश होत नाही.

e)      फवारणी कमी रुंदीच्या भागावर करता येते.

f)       फवारणीची कार्यक्षमता कमी

g)      हवेबरोबर उडून जात नाहीत (पेस्टीसाईड ड्रिफ्ट कमी)

C.      शेतकऱ्याला सर्वाधिक वेगाने, कमीत कमी पाणी वापरून फवारणी करायची असते (कारण अधिक पाणी = अधिक वेळा टाकी भरणे, ट्रॅक्टरचा जास्त वापर = अधिक इंधन = तसेच फवारणीसाठी अधिक वेळ व खर्च)

फवारणी हि एक गतिशील प्रक्रिया आहे व त्यामध्ये हंगामानुसार, हवामानानुसार, बागेतल्या भौगोलिक परिस्थिती, लीफ इंडेक्स नुसार फवारणीसाठी वापरायचे पाण्याचा वापर, नोझलचा प्रकार, प्रेशर, थेंबाचा आकार, इत्यादी मध्ये बदल करणे अपेक्षित असते.

फवारणीची कार्यक्षमता म्हणजे काय?

फवारणीची कार्यक्षमता: फवारणी यंत्राच्या नोझलपासून थेंब लक्ष्यापर्यंत पोहचताना अनेक कारणीभूत परिस्थितीशी सामना करावा लागतो व त्यामुळे कार्यक्षमता कमी असते.

पेस्टीसाईडची फवारणी प्रक्रिया किती अकार्यक्षम आहे याची जाणीव बहुतेकांना नाही.  (Graham-Bryce, I.J. (1977) Royal Society London B. 281:163-179) यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधावरून विविध पीक/ कीटक यावरील फवारणीची कार्यक्षमता दर्शवली आहे ती पुढील प्रमाणे. जवळपास ५० वर्षापूर्वीचा हा शोधनिबंध असला तरी फवारणी तंत्र/यंत्रामध्ये फारसा बदल झाला नसल्यामुळे कार्यक्षमतेमध्ये फार मोठा बदल झाला असे म्हणता येत नाही.

पद्धत

लक्ष्य

कार्यक्षमता (%)

फवारणी

कोको वरील कॅप्सिड कीटक

०.०२

फवारणी

घेवडा वरील मावा

०.०३

बीज प्रक्रिया

बार्ली वरील बुरशी

२.२

जमिनीमध्ये ग्रॅन्युलसचा वापर

गहू वरील मावा

२.९

फवारणी

उडणाऱ्या टोळांची झुंड

६.०

फवारणी

गवत (स्पर्शजन्य तणनाशक)

३०

पेस्टीसाईड डोस: 

  • योग्य पद्धतीने, योग्य डोस वापरला तरी, पेस्टीसाईडचे पर्यावरण किंवा लक्ष्य नसलेल्या सजीवांवर अनपेक्षित परिणाम होतातच.
  • शिफारस केलेल्या पेस्टीसाईडच्या डोसने संवेदनशील तसेच प्रतीकारशील कीड-रोग प्रजातीचे निर्मुलन करणे अपेक्षित आहे.
  • वातावरणामध्ये पेस्टीसाईड फवारल्या नंतर लक्ष्य असलेल्या सजीवांपर्यंत पोहचणारा डोस मध्ये बरीच तफावत असते.
  • कमी डोसच्या वापराने अपुऱ्या विषारीपणामुळे लक्ष्य केलेले सजीवांमध्ये त्या पेस्टीसाईडला प्रतिकारक्षम असणाऱ्या पिढ्या निर्मित होतात.
  • वापरलेल्या पेस्टीसाईड पैकी फार थोडा भाग लक्ष्यापर्यंत पोहचतो.
  • सर्वाधिक पेस्टीसाईडचे प्रमाण फवारणीच्या वेळेला उपलब्ध असते. औषध पृष्ठभागापर्यंत न पोहचणे, पृष्ठभागावरून औषध निथळून जाणे, पडलेले थेंब परावर्तीत होऊन जमीनीवर जाणे, ड्रिफ्ट, तापमान, वाऱ्याचा वेग, थेंबांचा आकार, द्रावणातील जलद गतीने वायुरूप होणारे घटक उडून जाणे, पेस्टीसाईडचे विघटन अशा अनेक कारणांमुळे फवारलेल्या डोस च्या तुलनेत पोहचलेल्या पेस्टीसाईडचे प्रमाण पुष्कळ कमी राहते.
  • यामुळे शिफारस केलेला पेस्टीसाईडचा डोस हा कीड-रोग निर्मुलनासाठी असलेल्या डोस पेक्षा खूप जास्त असतो.

पेस्टीसाईड डोसला प्रतिसाद: आपण किती पेस्टीसाईड फवारतो? आणि नक्की किती प्रमाणाची गरज आहे.? टिमोथी ए एबर्ट, कृषी संशोधन आणि विकास केंद्र - ओहायो. यांच्या शोधनिबंधामधील माहिती उद्बोधक आहे.

घेवडा वर्गीय पिकामध्ये अळी साठी आर्थिक दृष्ट्या नुकसान कारक पातळी (ETL) = ८ मोठ्या आळ्या प्रती ओळ / फुट (३०.५ सेमी = ०.३०५ मी) अशी दिली आहे. म्हणजेच पिकामध्ये आळ्यांची हि ETL असेल तर हेक्टरी ७,३८,००० आळ्या असणार.

कारण,

०.३०५ लांबी मी. x ०.३५५ रुंदी मी. = एका ओळीचे क्षेत्र = ०.१०८ चौमी

०.१०८ चौमी ÷ १०,००० चौ मी  = ९२,२६२

९२,२६२ x ८ आळ्या = ७,३८,००० आळ्या प्रती हेक्टरी.

असे गृहीत धरले आहे कि सर्व आळ्या या चौथ्या अवस्थेतल्या असून त्यांचे सरासरी वजन ३५ मिलीग्रॅम आहे. तर,  ७,३८,००० आळ्या x ०.०३५ ग्रॅम = २५,८३३ ग्रॅम. 

प्रयोगशाळेमध्ये, एका कीटकनाशकाचा LD95 डोस, हा ४.५ मायकोग्रॅम /ग्रॅम आहे. (LD95 म्हणजेच ९५% आळ्या मारण्यासाठी लागणारा डोस.) म्हणजेच २५,८३३ ग्रॅम वजन असलेला ७,३८,००० आळ्या मारण्यासाठी लागणारे कीटकनाशकाची मात्रा ४.५ मायकोग्रॅम /ग्रॅम = ०.०००००४५ ग्रॅम/ग्रॅम = ०.१६६ ग्रॅम इतके कीटक नाशक वापरावे लागेल. 

प्रत्यक्ष शेतात फवारणी करताना, हेच कीटकनाशक प्रती हेक्टरी १४६ आणि २८० ग्रॅम वापरले असता ७८% आणि ८५% नियंत्रण मिळवता आले. याचा अर्थ ७८% नियंत्रणासाठी १२०० पट जास्त कीटकनाशक प्रत्यक्ष वापरले गेले तर, ८५% नियंत्रणासाठी २४०० पट जास्त कीटकनाशक प्रत्यक्ष वापरले गेले.

सर्वच कीड/रोग नाशकांच्या बाबत प्रयोगशाळेत कीड/रोग मारण्याचा डोस व प्रत्यक्ष शेतामध्ये कीड/रोग मारण्याचा डोस यामध्ये प्रचंड तफावत आहे. हे पुढील संदर्भावरून दिसून येते.   

प्रचलित व सर्वसाधारण फवारणी यंत्र/ तंत्रज्ञानाने उगवणी पश्चात तणनाशकाचा वापर करताना ५% पेक्षा कमी तणनाशक, तणापर्यंत पोहचते तर ०.१% पेक्षा कमी कीटकनाशक/बुरशीनाशक लक्ष्य असलेल्या कीड-बुरशी पर्यंत पोहचते. (संदर्भ: (१) Vern Hofman, Mark Walter, Les Backer - Agricultural and Biosystems Engineering - NDSU, Fargo; (२) पिमेंटल, Amounts of pesticides reaching target pests, Journal of Agriculture Environment - 1995)

अ.   फवारणीची कार्यक्षमता: फवारणीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे दर्शविली जाऊ शकते: फवारणी कार्यक्षमता (%) = एकूण फवारलेल्या पाण्यापैकी पानावरती शिल्लक (Deposition) राहिलेल्या पाण्याचे प्रमाण. 

$ फवारणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी काय उपाय योजना करता येऊ शकतात याबाबत माहिती लेखाच्या शेवटी दिली आहे.

थेंबाच्या आकाराची विविधता: सर्व फवारणी यंत्रामधून निर्माण होणाऱ्या थेंबामध्ये खूप विविधता असते. यामध्ये अतिसूक्ष्म पासून खूप मोठे अशा सर्व व्यासाचे थेंब तयार होऊ शकतात. परिणामकारक फवारणीसाठी जास्तीत जास्त थेंब एकसमान आकाराचे असणे गरजेचे आहे. थेंबांचा आकार मोजण्यासाठी VMD (व्हॉल्यूम मीडियन डायमीटर) हि संज्ञा वापरली जाते. म्हणजे फवाऱ्यातले ५०% थेंबाचा सरासरी आकार (व्यास) VMD पेक्षा मोठा तर ५०% चा आकार VMD पेक्षा लहान असतो

आकृती: VMD

जेव्हा फवारणीसाठी वापरलेल्या थेंबांचे आकारमा

न कमी केले जाते, तेव्हा त्यांची संख्या वाढते तसेच वाऱ्यासोबत वाहून जाण्याची क्षमता देखील वाढते. थेंबाचा व्यास अर्ध्याने कमी केल्यावर थेंबांची संख्या आठपट वाढते.

थेंबाच्या आकारानुसार वर्गीकरण: फवारणीच्या नोझल्सचे वर्गीकरण :

  • अगदी सूक्ष्म (VF) <२० µm,
  • बारीक (F) १०० µm,
  • मध्यम (M) २४० µm,
  • मोठे (C) ४०० µm,
  • खूप मोठे (VC) १००० µm. 

पाण्याच्या थेंबांचे भवितव्य: पाण्याच्या थेंबाचे बाष्प होते. थेंबाचे आयुष्यमान हे थेंबाचा आकार, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यावर अवलंबून असतो. मोठ्या थेंबापेक्षा लहान थेंबांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे लहान थेंबांचे आकारामान झपाट्याने कमी होते. पाण्याचा/ रसायनाचा संपूर्ण अंश उडून गेला कि द्रावणामधील रसायनांचा शुष्क अंश पानावर राहतो.   

स्प्रे कवरेज (spray coverage): पेस्टीसाईड ज्या पृष्ठभागावर फवारले आहे, त्या पृष्ठभागापैकी किती % पृष्ठभाग हा पेस्टीसाईड द्रावण (यामध्ये पाणी + क्रियाशील घटक + Adjuvant  समाविष्ट आहे) याने व्यापतो याला स्प्रे कवरेज म्हणतात. उत्तम कवरेज हा कार्यक्षम फवारणी होण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे.

  •  स्प्रे अँगल: नोझलच्या टोकाजवळ मोजलेला कोन (A).  
  • प्रत्यक्ष स्प्रे कव्हरे: नोजलपासून (C) उंचीवरून मिळणारे प्रत्यक्ष कव्हरेज  (B).

रीटेंशन: फवारलेल्या द्रवापैकी पिकांच्या पानांवर शिल्लक राहिलेले द्रावण.

सर्वच वनस्पतीची पाने जल विरोधी (हायड्रोफोबिक) असतात. मात्र अनेक वनस्पतीमध्ये पानांवरती असणाऱ्या विशिष्ठ मेणचट आवरणामुळे त्यावर पाणी अजीबात ठरू देत नाहीत. उदा: अळू, कमळ. 

कमळाच्या पानावरील पाण्याचा थेंब.

कमळाच्या पानावरील वैशिष्ठय पूर्ण रचना ज्यामुळे त्यावर थेंब पसरत नाहीत.

काही पानांवर असणारे लव/केस, त्यामुळे पाणी थांबत नाही.

काही पानांवरील मेणचट आवरण, त्यामुळे पाणी थांबत नाही.

काही वनस्पती विशेषतः तणांची वाढ हि सरळसोट असते व त्यामुळे त्यांच्यावर पाणी टिकू शकत नाहीत.

सरळ वाढणारे तण. (सायप्रस रोटंडस)

काही पानांवरती असणारे केस/लवमुळे पाण्याच्या थेंबाचा स्पर्श पानांच्या पृष्ठभागाशी होत नाही. वनस्पतीची पाने जल विरोधी नसतील, तसेच रुंद व जमीनीला समांतर अशा पद्धतीने वाढत असतील तरच त्यावर फवारलेलं पाणी अधिक चांगल्या रीतीने टिकू शकते. 

पानावर पडणाऱ्या थेंबांचे भवितव्य:  नोझल मधून निघालेल्या थेंबामध्ये उर्जा असते, त्यामुळे पानावर पडताना खालील पैकी घटना घडतात.

  • थेंब पानावरती पडताच, उसळी घेऊन परावर्तीत होतो.
  • मोठे थेंब फुटून त्याच्यापासून अनेक लहान थेंब तयार होतात. बहुतांश हे सर्व पानावरून उडून पडतात.    

पानावर पडताच उसळी घेणारे थेंब.

पानावर पडणारे थेंब पानावर टिकून राहण्यासाठी द्रावणाच्या पृष्ठ भागावरचा ताण कमी करणे, थेंबाचा आकार लहान करणे, कमी दाबाने फवारणी करणे, द्रावणाचा घट्टपणा/ चिकटपणा मध्ये वाढ करणे अशा उपाय योजना करता येतात व त्याने मोठ्या प्रमाणात फायदा होतो. 

डिपोझिशन (Deposition): प्रति चौ.सेमी. पृष्ठभागावरती जमा झालेल्या पेस्टीसाईडची शुष्क मात्रा (amount) व स्वरूप (pattern).

स्प्रे डिपोझिशन वर परिणाम करणारे घटक:

1.       थेंबाचा आकार: सर्व प्रकारच्या स्प्रेयर मधून फवारणी करताना निर्माण होणाऱ्या थेंबाच्या आकारामध्ये बरीच मोठी तफावत आढळून येते. योग्य प्रकारच्या नोझलच्या वापराने व सातत्याने योग्य प्रेशर ठेवल्याने या तफावतीचे प्रमाण कमी करता येते. मोठे थेंब हे एकतर लक्ष्यापर्यंत अथवा गुरुत्वाकर्षनाने जमिनीवर पडतात पण लहान थेंब हे हवेसोबत तरंगू शकतात आणि लक्ष्यापासून दूर जाऊ शकतात. हवामानाची परिस्थिती योग्य असताना ५ किलोमीटर प्रती तास एवढ्या वाऱ्यामध्ये २० मायक्रॉनचा थेंब ३३८ मीटर इतक्या लांब जाऊ शकतो. मात्र २०० मायक्रॉनचा थेंब फक्त काही मीटर प्रवास करेल. लहान थेंबांचा वापर टाळला तर लक्ष्यापासून लांब उडून जाणाऱ्या पेस्टीसाईडचे प्रमाण कमी करता येते मात्र, मोठ्या थेंबांच्या वापराने खूप अधिक फवारवे लागते.

थेंबाचा आकार व थेंबातील पाण्याचे प्रमाण याचा संबंध खालील समीकरणातून दिसतो.

Volume = π d3 / 6 म्हणजे  थेंबाचा व्यास दुप्पट केला कि त्यातील volume ८ पट वाढते. उदा: ४०० मायक्रॉनच्या थेंबाचे volume २०० मायक्रॉनच्या थेंबापेक्षा ८ पट जास्ती आहे. किंवा २०० मायक्रॉनच्या ८ थेंबामध्ये ४०० मायक्रॉनच्या एका थेंबाचे volume आहे.  



फवारणी करताना तापमानाचा थेंबावर होणारा परिणाम: तापमान, वाऱ्याचा वेग व आर्द्रता यांचा फवारणीच्या कार्यक्षमतेवरती मोठा परिणाम होतो. फवारणीच्या वेळेला जर जोराचा वारा असला तर फवारलेले थेंब लक्ष्यापासून दूर जातील. फवारलेले बारीक थेंब पानापर्यंत पोहचण्यापूर्वी त्याचे बाष्पीभवन झाले तर त्या पेस्टीसाईडची फवारणी परिणामकारक होणार नाही. फवारणीसाठी सुयोग्य परिस्थिती दर्शवण्यासाठी डेल्टा टी (ΔT) चा वापर केला जातो. ΔT हे थेंबाचा जीवन काळ व थेंबाच्या बाष्पीभवनचा वेग दर्शवतो. हवेचे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचा  ΔT च्या मूल्यांशी संबंध दर्शवला आहे. पेस्टीसाईड फवारताना ΔT 2 आणि 8 च्या दरम्यान असावा. 

विंडमेट हे उपकरण प्रत्यक्ष शेतामधील वाऱ्याचा वेग, सापेक्ष आर्द्रता, तापमान, दव बिंदू, व ΔT दर्शवते.

ΔT चा विविध प्रकारच्या थेंबाच्या आकारावरती होणारा परिणाम दर्शवणारा तक्ता खालील प्रमणे.

तपशील

थंड हवामान

समशीतोष्ण हवामान

उष्ण हवामान

 

तापमान (0C)

सापेक्ष आर्द्रता (%)

डेल्टा टी

१६

५८

४.५

२५

५०

३०

८९

१.५

 

थेंबाचा व्यास (मायक्रॉन)

थेंबाचे आयुष्यमान

(सेकंद)

थेंबाचा प्रवास* (मीटर)

थेंबाचे आयुष्यमान

(सेकंद)

थेंबाचा प्रवास* (मीटर)

थेंबाचे आयुष्यमान

(सेकंद)

थेंबाचा प्रवास* (मीटर)

१०

०.३

०.०००४

०.२

०.०००३

०.८

०.००१३

३०

२.५

०.०३

१.६

०.०२

७.५

०.१०

४०

४.४

०.११

२.९

०.०७

१२

०.३२

१००

२८

४.२

१८

२.७

८३

१२.५

२००

१११

६७

७१

४३

३३३

२००

३००

२५०

३३८

१६१

२१७

७५०

१०१३


*थेंबाचा प्रवास: थेंब जमीनीच्या दिशेने टर्मिनल व्हेलोसीटी ने प्रवास करेल असे गृहीत धरले आहे. (संदर्भ: एम्सडेन, १९६२).

लीफ एरिया इंडेक्स (LAI) (पानाच्या क्षेत्रफळाचा निर्देशांक)

  • फवारणीसाठी लक्ष्य असलेल्या पानांचे क्षेत्रफळ जमिनीच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असू शकते. LAI हे पानांचे क्षेत्र आणि जमिनीच्या क्षेत्राचे गुणोत्तर आहे.  LAI = पानांचे क्षेत्र ÷ जमिनीचे क्षेत्र. 
  • वनस्पतींच्या वाढीनुसार वेगवेगळ्या पिकांनुसार LAI बदलते.
  • पिकानुसार LAI चे गुणोत्तर वेगवेगळे असते, परंतू ६/७ पेक्षा क्वचितच जास्त असते.
  • म्हणूनच पिकानुसार आणि (पानांच्या क्षेत्रफळानुसार) प्रति एकर फवारणीसाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.
  • स्पर्शजन्य पेस्टीसाईडसाठी खूप उत्तम कवरेजची गरज असते तर आंतरप्रवाही पेस्टीसाईडसाठी त्याला तेवढे महत्व नसते. पानावरती किती थेंबांचे कवरेज आवश्यक आहे हे समस्येवर अवलंबून आहे. (समस्या म्हणजे कीटक / बुरशी / तण)    
  • तात्विकदृष्टया, १ लिटर/हेक्टर या प्रमाणात थेंबाच्या आकारानुसार व वेगवेगळ्या LAI असताना फवारणी केली तर किती थेंब प्रती चौरस सेमी बसू शकतात हे दर्शवणारा तक्ता खाली दिला आहे. (या मध्ये सर्व थेंब एकसमान आकाराचे व सर्व थेंब पानावरतीच पडत आहेत असे गृहीत धरले आहे.)
  • मात्र, पानांच्या दोन्ही पृष्ठभागावरती जर हे थेंब बसायचे असतील तर दिलेल्या संखेला २ ने भागावे लागेल.

थेंबाचा व्यास

LAI १ ते ७ च्या दरम्यान थेंबांची घनता (प्रती चौ.सेमी.)

१०

१९,१००

९५५०

६३६४

४७७३

३८१८

३१८२

२७१७

२०

२३८०

११९०

७९५

५९६

४७७

३९८

३४१

५०

१५३

७७

५१

३८

३१

२६

२२

१००

१९

९.५

३.२

२.७

२००

२.४

१.२

०.८

०.६

०.५

०.४

०.३

४००

०.३

०.१५

०.१

०.०८

०.०६

०.०५

०.०४

प्रत्यक्षात असे घडू शकत नाही.

प्रती हेक्टरी फवारणीचे प्रमाणाचा व लक्ष्य असलेल्या क्षेत्रफळाचा फारसा काही संबंध नसतो. कारण   वास्तवामध्ये, पानांचे क्षेत्र निर्देशांक (leaf area index) १ असण्याची शक्यता फारच कमी. पीक उगवून येते त्या वेळेला हा निर्देशांक अपूर्णांकात असतो तर तृण धान्यामध्ये तो ५ पेक्षा जास्ती असू शकतो. फळ झाडांमध्ये युनिट कॅनोपी रो सिस्टीम हि पद्धत वापरली जाते. (संदर्भ: Furness et al., १९९८).

असरदार कीड/रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे:

  • ड्रिफ्ट कमी करण्यसाठी व उत्तम परिणाम साधण्यासाठी फवारणीचे जास्तीत जास्त थेंब १०० ते ३०० मायक्रॉन आकाराचे असावेत.  
  • पेस्टीसाईडचा सर्वाधिक अपव्यय मोठ्या थेंबांमुळे होतो, कारण त्यांचा टर्मिनल वेग जास्त असतो आणि ते वेगाने खाली पडतात.
  • जरी मोठे थेंब लक्ष्यावर पडले तरीही ते पानावर उसळी मारून वाया जाऊ शकतात.
  • ४० मायक्रॉनच्या १००० थेंबामध्ये जेवढे द्रावण असते तेवढे ४०० मायक्रॉनच्या एका थेंबामध्ये असते. हा मोठा थेंब पानावर पडला नाही तर त्यातील औषध वाया जाते. 

अ.    व्हॉल्यूम अॅप्लिकेशन रेट (VAR):  पीकं व फळ झाडांसाठी प्रति हेक्टर फवारलेल्या द्रावणाचे प्रमाण. (संदर्भ: मॅथ्यू, २०००)

  

 

 

तपशील

व्हॉल्यूम अॅप्लिकेशन दर (लिटर/हेक्टर)

पीक

फळझाडे

हाय व्हॉल्यूम (HV)

> ६००

> १०००

मिडीयम व्हॉल्यूम (MV)

२००-६००

५००-१०००

लो व्हॉल्यूम (LV)

५०-२००

२००-५००

व्हेरी-लो व्हॉल्यूम (VLV)

५-५०

५०-२००

अल्ट्रा-लो व्हॉल्यूम (ULV)

<५*

<५०

* ०.२५-२ ली/हे ची VARs जंगलातील किंवा स्थलांतरित कीटकांसाठी आहे.


  • NR = फवारणीची वास्तववादी परिस्थिती नाही (>100% कव्हरेज वर थेंबांचे एकत्रीकरण दर्शवते).
  • एका थेंबासाठी (स्प्रेड फॅक्टर = २) 

स्प्रे ड्रिफ्ट: पेस्टीसाईडची फवारणी दरम्यान हवेतून निर्धारित लक्ष्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी होणारी संचार. 
१. पेस्टीसाईड फॉर्म्युलेशनमध्ये जलद गतीने वायुरूप होणारा अंश (volatile) तसेच पेस्टीसाईड द्रावणाचा घट्टपणा / चिकटपणा (density & viscosity).
२. फवारणीसाठी वापरलेले उपकरण, नोझलचा प्रकार, पाण्याचा दाब.
३. फवारणीच्या वेळी हवामानाची परिस्थिती (वाऱ्याचा वेग आणि दिशा, तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि डेल्टा T)
४. ऑपरेटरची काळजीपूर्वक काम करण्याची वृत्ती/ स्वभाव आणि कौशल्य.
५. फवारणीसाठी अनुकूल असणाऱ्या वाऱ्याच्या वेग ताशी ३-५ किमी असावा.
६. ड्रिफ्ट कमी करण्यासाठी उपाय:
   अ. नोझल पासून पानांचे अंतर wide angle नोझल वापरून कमी करू शकतो.
ब. फवारणीसाठी कमी दाब वापरला, तर मोठे थेंबच तयार होतात.
क. जास्त क्षमतेचे (मिली प्रती सेकंद) चे नोझल वापरावे.
७. लहान थेंबाच्या निर्मितीमुळे drift चे प्रमाण वाढते.

तक्ता: विविध प्रकारच्या नोझल मधून ठराविक VMD असताना त्यामधून १०० मायक्रॉन (व्यास) पेक्षा कमी असणाऱ्या थेंबांची % (टक्केवारी).

नोझल नंबर

प्रेशर (KPa)

फ्लो रेट (L/min)

VMD

१०० पेक्षा कमी मायक्रॉन व्यास असणाऱ्या थेंबांची %.

११००१

४५०

०.४८

१०६.७

४५

११००३

३००

१.१२

१८६.६

१९.१

११००६

२००

१.९

२६८.१

१०.६

८००८

२५०

२.७

३६६.६

५.१

६५१०

२००

३.०

४८४.२

३.६

द्रावणाच्या घनतेच्या थेंबाच्या तरंगण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम. 

तक्ता: थेंबाची अंतिम गती (मी/से.) आणि स्थिर हवेतील थेंबाचा प्रवास (मीटर)

 

थेंबाचा व्यास (μm)

द्रावणाची घनता

 

३ मीटर वरून फॉल टाईम (वि. गुरुत्व=१)

१.०

२.५

०.००००३

०.००००८५

२८.१ तास

१०

०.००३

०.००७६

१६.९ मिनिटे

२०

०.०१२

०.०३१

४.२ मिनिटे

५०

०.०७५

०.१९२

४०.५ सेकंद

१००

०.०२७९

०.५४९

१०.९ सेकंद

२००

०.७२१

१.४०

४.२ सेकंद

५००

२.१३९

३.८१

१.६५ सेकंद


















$ फवारणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपाययोजना:

  • पिकावरील कीड/रोगाची टेहळणी/निरीक्षण सातत्याने करत राहणे व त्यानुसार ETL नुसार गरजेप्रमाणे फवारणी करणे.
  • कमीत कमी फवारणी व पेस्टीसाईडचा वापर हे उद्दिष्ट असायलाच हवे.
  • वारंवार फवारणी करण्या एवजी कीड रोगांचा जीवनक्रम, त्यांची संवेदनशील अवस्था, वापर करावयाच्या पेस्टीसाईडचे गुणधर्म, याचा पूर्ण अभ्यास करून नियोजन करावे. महाग औषधाची १ फवारणी करण्यापेक्षा मी स्वस्तच्या ३ करीन हा तर्क फायदेशीर नाही. योग्य तेच निवडावे.
  • फवारणी करताना कमी तापमान व जास्त आर्द्रता हि परिस्थिती नेहमीच फायदेशीर असते याने पानावर फवारलेले पाण्याचे बाष्प होण्यास अधिक काळ जातो, आंतरप्रहावी औषध पानामध्ये शोषण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शक्यतोवर डेल्टा टी बघूनच फवारणी करावी. 
  • ट्रॅक्टर/फवारण्याचा वेग कमी केल्याने, दाट कॅनोपी मध्ये अधिक पाण्याचे थेंब जाऊ शकतात. (penetration).
  • बहुतेक सगळी कीटक/बुरशी नाशके हि आम्ल सामुमध्ये (pH ६) अधिक परिणामकारक असतात.
  • अनेक रोगांसाठी विशेषत: केवडा/भुरी बुरशीचा संसर्ग होण्यासाठी तापमान, पानाचा ओलेपणा (%) व ओलेपणा किती तास टिकून राहिला यावर रोगाची लागण/प्रसार होणार कि नाही हे ठरते. त्यामुळे फवारणी करण्याची गरज आहे कि नाही, प्रतिबंधात्मक का रोगनिवारक बुरशीनाशके वापरायचे व कोणत्या प्रकारची बुरशीनाशके (स्पर्शजन्य/आंतरप्रवाही) वापरायची हे ठरवता येते.
  • फवारणीची परिणामकारकता वाढवण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावरील असलेला ताण कमी करून, पानाच्या पृष्ठभागाशी संपर्क वाढवण्यासाठी त्या थेंबाचे रुपांतर फिल्म मध्ये करणे, आंतरप्रवाही औषधांचे जलद गतीने पानामध्ये वहन करणे, यासाठी Break Thru S 240® हे सुपर स्प्रेडर व सुपर पेनिट्रेंट उत्तम काम करते. फवारलेली तणनाशके तणांच्या पृष्ठ भागावर पसरत नाहीत / टिकून राहत नाहीत. येथे देखील तणनाशकाची मात्रा वाढवण्याएवजी Break Thru S 240®  चा वापर अधिक परिणाकारक व किफायतशीर राहतो.  

फवारल्यानंतर पेस्टीसाईडचे काय होते?:

  • शोषण (ऍबसॉरप्शन): पेस्टीसाईडचे रेणू वनस्पतींच्या ऊतींमध्ये शोषले जातात.
  • पृष्ठ भागावर चिकटणे (ऍडसॉरप्शन): पेस्टीसाईडच्या रेणूंचे मातीच्या कणांना चिकटणे/ मातीच्या कणांशी होणारे भौतिक बंधन.
  • विघटन: पेस्टीसाईडची फवारणी करताच, सामान्यतः त्यांचे विघटन होऊन कमी विषारी असलेल्या सोप्या संयुगांमध्ये परिवर्तीन होते.  
  • धूप (Erosion): अतिवृष्टी किंवा जास्त सिंचनामुळे फवारणी केलेल्या जागेवरून मातीच्या कणांचे विस्थापन. ऍडसॉरप्शन मध्येहि धूप होते.
  • वाहत्या पाण्यासोबत वाहून जाणे: जेव्हा विद्राव्य किंवा अविद्राव्य पेस्टीसाईड फवारणी केलेल्या जागेवरून मातीच्या पृष्ठभागावर येतात तेव्हा, एकतर ते विरघळतात किंवा पाण्यावर तरंगतात.
  • भूजलात मिसळणे: विद्राव्य पेस्टीसाईड जमिनीत झिरपून भूजलात मिसळतात. 

पेस्टीसाईडची विघटनाचे काही प्रकार:

  • फोटोलिसिस (फोटोकॉम्पोझिशन): सूर्यप्रकाश व त्यातील UV किरणांद्वारे होणारे  विघटन.
  • हायड्रोलिसिस: पेस्टीसाईडच्या रेणूंचे पाण्यामुळे होणारे विघटन. उच्च सामू असलेल्या पाण्यामुळे अल्कलाईन हायड्रोलिसिस हि प्रक्रिया घडून पेस्टीसाईडच्या रेणूंचे जलद गतीने (अगदी काही तासात) विघटन होते.
  • सूक्ष्मजीवाणू द्वारे होणारे विघटन
  • हवेत उडून जाणे : पेस्टीसाईड द्रावणातील घटक जलद गतीने वायुरूप होऊन उडून जातात. 

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments