आच्छादन पिक /
पिके उत्पादनाऐवजी जमीनीच्या फायद्यासाठी मुख्यत: लावली जातात. आच्छादन पिके
लावण्यामागचा प्रमुख उद्देश हा तणांची वाढ रोखण्यासाठी, जमीनीची धूप
थांबवण्यासाठी, जमीनीत पाणी मुरण्यासाठी, जमीनीची सुपीकता वाढवण्यासाठी,
कीड-रोगांचे नियंत्रण करण्यासाठी व जैव- विविधता जोपासण्यासाठी केली जाते.
यामुळे दाट खोल
मुळे असणाऱ्या गवत वर्गीय वनस्पती, नत्र स्थिर करणाऱ्या द्विदल वनस्पती, फुलांमुळे
मधमाशांसाठी खाद्य पुरवणाऱ्या वनस्पती, कंद वर्गीय वनस्पती अशा विविध वनस्पतींच्या
गुणधर्म, जीवन क्रम इत्यादी विविध बाबींचा विचार करून लागवड केली जाते.
आच्छादन पिकांचा
पावसाच्या पाण्याद्वारे होणाऱ्या धूपेवर परिणाम.
सजीव आणि मृत आच्छादन पिकांच्यामुळे पावसाच्या थेंबांचे जमिनीवर होणाऱ्या आघातापासून बचाव होतो व मातीचे कण विस्थापित होत नाहीत. आच्छादन पिकांची मुळे सर्वदूर पसरल्यामुळे तसेच गांडुळांनी भुसभुशीत केलेल्या जमिनीत पावसाचे पाणी चांगल्या रीतीने मुरते. आच्छादन पिकांची मुळे मातीचे कण धरून ठेवल्यामुळे जमिनीची धूप होत नाही.
संदर्भ: http: //wiki.ubc.ca/LFS: Soilweb & USDA ARS
आच्छादन पिकांमुळे मिळणारे विविध फायदे:
- उत्पादनात वाढ.
- जमीनीतील सेंद्रिय पदार्थात वाढ.
- पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण वाढवते.
- तणांचे नियंत्रण करते.
- परागीकरण आणि मित्र कीटकांना प्रोत्साहन देते.
- मातीचा कडकपणा कमी करते.
- द्विदल वनस्पतीद्वारे नत्राचे स्थिरीकरण.
- आर्थिकदृष्टया फायदेशीर.
- जमिनीची धूप थांबवते.
- नत्राचा कार्यक्षम उपयोग करून घेते.
- जमिनीचे आरोग्य सुधारते.
संदर्भ: North centre SARE (Sustainable Agriculture Research and Education) |
आच्छादन पिकांनी
जमिनीतील गांडुळांची संख्या वाढते. या प्रयोगात सतत ७ वर्ष तृणधान्य + राय गवत
(आच्छादन पीक) असलेल्या शेताची तुलना फक्त तृणधान्य असलेल्या संलग्न ६ शेतांशी
केली व त्यामध्ये लुम्ब्रिकस या जातीच्या गांडुळांची संख्या मोजली. यामध्ये
आच्छादन पीक असलेल्या भागामध्ये २२१% अधिक गांडुळे दिसून आली.
संदर्भ: Iowa Learning farms |
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
Comments
Post a Comment