श्री रवींद्र थत्ते,
संचालक,
इको ऍग्रो ग्रुप, पुणे.
केळी बाबत:
- केळी हे जगातील चौथे महत्वाचे फळ असून,उष्णकटिबंधातील अनेक देशात त्याची लागवड केली जाते.
- अनेक देशांची अर्थव्यवस्था केळी पिकावर अवलंबून असून, सर्वसामान्य माणसांचे हे आवडते फळ आहे.
- जगातील सर्वात जास्त केळीचे उत्पादन भारतात घेतले घेतले.
विविध देशातील केळी उत्पादन (२०१४)
संदर्भ: http://agriexchange.apeda.gov.in/Market%20Profile/one/BANANA.aspx
केळीची मुळं
- केळीची ९०% मुळे खोडापासून १ मीटर (३ फूट) अंतरापर्यंत असतात.
- जमिनीमध्ये २० ते ४० सेंटीमीटर खोलीच्या दरम्यान ७०% मुळे असतात.
- मुळांची वाढ सरळ होत असून ती ४-१० मिलीमीटर व्यासाची असतात. दोन महिन्यात क्रियाशील मुळे ३० सेंटीमीटर खोली पर्यंत आढळतात .
- केळी निसवण्यापर्यंत मुळांची नियमित वाढ होत राहते. केळी निसवताना जवळपास ६३८ मुळे असतात.
- मुळांचा व पानांच्या वाढीचा परस्परसंबंध असून त्यांची वाढ पानावाटे होणारे बाष्पीभवन, पानांचा आकार, खोडाचा आकार यावर अवलंबून आहे.
- बारीक पांढऱ्या केशमुळांचे आयुष्य ३ आठवडे, तर दुय्यम व तृतीय मुळांचे आयुष्य ५-८ आठवडे असते व मुख्य मुळाचे आयुष्य ४-६ महिन्यार्यंत असू शकते.
- बारीक पांढऱ्या केशमुळांचे पृष्ठभागाचे आकारमान जास्त असल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा / शोषण त्याद्वारे मुळांच्या वाढीसाठी २०-२२ डिग्री तापमान योग्य असते, जमिनीचे तापमान ३५ हुन अधिक तसेच १३ हुन कमी झाल्यास मुळांची वाढ थांबते.
- ० ते ३० सेंटीमीटर (१ फूट) जमिनीच्या खोलीमधून ६०% पाण्याचे शोषण होते तर, ५० ते ८० सेंटीमीटर (१.५ ते २.५ फूट) खोलीमधून ४०% पाण्याचे शोषण होते.
केळीचे पान
- केळ्यांची उत्तम लांबी, जाडी व घडाचे अधिक वजन मिळण्यासाठी 8-10 कार्यक्षम पाने पुरेशी असतात.
- जुनी पाने पिकल्यानंतर पानांचे एकूण क्षेत्रफळ कमी होऊ लागते.
- केळी निसवल्या नंतर नवीन पानांची उत्पत्ती होत नाही.
केळी पोषक तत्वे
- खोडापासून ३० ते ६० सेंमी व ६० ते ९० सेंटीमीटर च्या परिघात पोषणद्रव्यांचे शोषण चांगले होते.
केळी पोषण: नत्र
- नत्र हे प्राथमिक पोषक घटकांपैकी एक असून प्रामुख्याने नायट्रेटच्या (NO3) स्वरूपात केळीच्या मुळांद्वारे शोषून घेण्यात येते.
- नत्र हे केळीच्या वाढीचा मुख्य प्रवर्तक असून, ते पाने व खोड यांची वाढ करते, व त्यामुळे अपेक्षित हिरवा रंग येतो. दर्जेदार उत्पादनासाठी निरोगी व मजबूत शाखीय वाढ आवश्यक आहे. पुरेश्या प्रमाणात नत्राचा पुरवठा असलेल्या केळीच्या खोडामुळे अधिक पानांचे उत्पादन होते.
- नत्राचा पुरवठा योग्य असल्यास केळीचे पाने उमलण्यास ७-१० दिवस लागतात. केळीमध्ये नत्राची कमतरता असेल, तर पाने उमलायला जास्त (२० दिवस सुद्धा) लागतात.
- नत्राच्या कमतरतेमुळे केळीची वाढ मंदावते, खालची पाने पिवळी पडतात, पानांचे आकारमान कमी होते. तसेच पानांचा देठ पातळ, लहान आणि संकुचित होतो. मुळे विपुल परंतु पातळ/बारीक होतात.
- पहिल्या 4-6 महिन्यां दरम्यान जास्त प्रमाणात, मोठ्या आणि निरोगी पानांची निर्मिती झाल्यास घडाचे आकारमान वाढते.
- नत्राचा योग्य पुरवठा झाल्यास घडाचा दर्जा वाढतो.
केळी पोषण: स्फुरद
- स्फुरदाने मुळांची वाढ, प्रकाश संश्लेषण, कर्बोदकांचे चयापचय आणि वनस्पतीमध्ये ऊर्जेचं वहन होते. यासाठी स्फुरद हा आवश्यक घटक आहे.
- स्फुरदाने पानाचे देठ मजबूत होते व केळी खोडाचा घेर वाढतो.
- केळी पिकास थोड्या प्रमाणात, परंतु कायमस्वरूपी स्फुरदाची गरज असते.
स्फुरद कमतरतेची लक्षणे |
केळी पोषण: पालाश
- प्राथमिक वाढीच्या अवस्थेत पालाशचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. जमिनीतून भरपूर पालाश सतत उपलब्ध झाला तर फळधारणा अवस्थेनंतरही पालाश जास्त प्रमाणात पिकाकडून घेतले जाते.
- पालाशचा केळीच्या वाढीच्या काळात अपुरा पुरवठा झाल्यास नत्र, स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर व झिंक या खनिज अन्नद्रव्ये तसेच कर्बोदकांच्या वहनावर मर्यादा येते यामुळे केळीच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होतो.
|
केळी पोषण: कॅल्शियम
- कॅल्शियम हे केळीच्या मुळे व पानेवाढीस मदत करते. यामुळे केळीच्या उत्पादनात वाढ होते.
- कॅल्शियमच्या उपलब्धतेमुळे केळीच्या फण्यांची व घडाची वाढ होण्यास मदत होते.
- कॅल्शियममुळे केळीची टिकवणक्षमता (साठवणीचा काळ) वाढते.
कॅल्शियम कमतरतेची लक्षणे
- वाढीच्या प्राथमिक अवस्थेनंतर झाडावर लक्षणे दिसून येतात.
- नवीन पानांची गुंडाळी बारीक व कमकुवत होते, तसेच दुमडली जाते
- सिगाटोका रोगाला लवकर बळी पडते.
- पानांच्या कडया जवळील मध्यशिरा पिवळसर पडतात.
केळी पोषण: मॅग्नेशिअम |
- मॅग्नेशियम हे पानातील हरित द्रव्य वाढण्यासाठी मुख्य घटक आहे. यामुळे कर्बोदके व प्रथिने इत्यादींचे चयापचय क्रियाशील होते.
- मॅग्नेशियमचा पिकामध्ये स्फुरद वहनासाठी महत्वाचा सहभाग असतो.
- केळी घड व उत्पादन वाढीमध्ये मॅग्नेशियमचे महत्वाचे कार्य असते.
मॅग्नेशियम कमतरतेची लक्षणे
- मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पात्यांचे मध्यवर्ती क्षेत्र पिवळसर होते. कडा व मधल्या शीरा हिरव्या राहतात.
- देठांवर जांभळ्या रंगाचे ठिपके पडतात.
- पाने खोडापासून वेगळी होऊ लागतात.
पाने खोडापासून वेगळी होऊ लागतात. "न्यूट्रीमॅग" – मॅग्नेशियम कमतरतेवर उपाय (फवारणी १ मिली/ लिटर) |
केळी पोषण: बोरॉन
- बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शिअमच्या वहनासाठी आवश्यक असते.
- बोरॉनमुळे केळी घडाची संख्या, वजन व एकूण उत्पादन वाढण्यास मदत होते.
- बोरॉनमुळे केळी पिकास दिलेले इतर अन्नद्रव्ये क्रियाशीलपणे उपलब्ध होण्यास मदत होते.
- बोरॉनच्या वापरामुळे केळी फळात गोडी वाढण्यास मदत होते.
|
केळी पोषण: लोह
- लोह हे हरितद्रव्ये व वनस्पती विकर, श्वसन इत्यादीसाठी महत्वाचे आहे.
- लोह वापरामुळे पिकाची वाढ व उत्पादन वाढण्यास मदत होते.
- लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे केळीच्या फण्या व घडाचे वजन वाढण्यास मदत होते. तसेच केळीच्या फळात गोडी वाढण्यास मदत होते.
लोह कमतरतेची लक्षणे:
- नवी पाने पिवळी पडतात,
- वाढ खुंटते, घड लहान राहतात.
न्यूट्रीफर - लोह कमतरतेवर उपाय. |
केळी पोषण: जस्त
- केळीसाठी जस्त हे सर्वात महत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.
- जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे केळी पिकात योग्य ती Enzyme (विकरे) निर्माण होउ शकतात. व त्यामुळे पिकातील वाढ नियंत्रकांच्या वाढीस मदत होते.
- जस्त च्या वापरामुळे केळीचे झाड, उत्पादन व दर्जा वाढण्यास मदत होते.
जस्त कमतरतेचे लक्षणे
- झिंक अन्नद्रव्याची कमतरता महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सर्वदूर आहे.
- पाने लहान आणि अरुंद होतात,
- फुलोरा उशिरा येतो.
- घड लहान निघतात.
झिंकफ्लो – जस्त कमतरतेवर उपाय - फवारणी ०.५ मिली / लिटर |
केळी रोग संरक्षण
- केळीच्या बागेतील सिगाटोका (Pseudocercospora musicola) रोग येण्याची कारणे:
- हा रोग उष्ण, दमट व अधिक वारा असलेल्या ठिकाणी पसरतो.
- ह्या रोगाचे बीजांडे वारा व पावसाच्या थेंबामुळे प्रसारित होतात.
- ह्या रोगामुळे पानावर ठिपके येऊन ती पाने करपून सुकतात.
सिगाटोका रोगाचे व्यवस्थापन:
- रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. बागेत हवा खेळती ठेवा.
- रोगाचे लक्षण दिसण्यापूर्वी अथवा दिसताच प्रतिबंधक उपाय योजना करावी.
- आंतरप्रवाही व स्पर्शजन्य औषधे ब्रेक थ्रू S२४० सोबत आलटून पालटून वापरावीत.
प्रतिबंधक उपाय योजना (फवारणी).
M-४५: (६०० ग्रॅम) + ब्रेक-थ्रू २४०: (५०मिली) प्रति एकर.
नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्यांची ग्रहणक्षमता:
- नत्र: केळी पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत सातत्याने गरज.
- स्फुरद: केळी पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत थोड्या प्रमाणात सातत्याने गरज.
- पालाश: केळी पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत सातत्याने गरज परंतु पालाशचा ८०% वापर फुलोऱ्याच्या मुख्य अवस्थेपूर्वी करावा.
- मॅग्नेशिअम: केळी पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत थोड्या प्रमाणात सातत्याने गरज.
- कॅल्शिअम: कॅल्शिअम चा मुख्य वापर घड निसवण्यापूर्वी महत्वाचा.
- गंधक: मुनव्यांपासून ते घड निसवण्यापर्यंत गंधकाचे जलद शोषण होते व घड निसवण्यानंतर शोषणाचा वेग मंदावतो.
टीप: हा तक्ता तुलनेसाठी दाखवला असून यावरून लक्षात येते कि आपल्या भागामध्ये केळीची उत्पादकता व लागवडीची घनता जास्त असल्यामुळे, अधिक प्रमाणामध्ये समतोल अन्नद्रव्ये देण्याची गरज आहे. तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी केळी पिकाने घेतलेली अन्नद्रव्ये पुनर्भरण करण्याची आवशक्यता आहे.
केळीच्या विविध अवयवांमध्ये होणारा अन्नद्रव्यांचा संचय:
केळीच्या तिसऱ्या पानाचे नमुना काढायचे ठिकाण.
केळीसाठी मृदा व्यवस्थापन.
- केळी पिकास उत्तम निचऱ्याची भुसभुशीत जमीन आवश्यक असते. जमिनीमध्ये पाणी थांबत असल्यास निचरा होण्यासाठी चर खोदणे व अन्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- भारी (चिकणमाती चे जास्त प्रमाण असलेली) जमिन सुधारण्यासाठी व जमीन भुसभशीत राहण्यासाठी पूर्ण कुजलेल्या भरपूर सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच चुनखडी युक्त जास्त सामूच्या जमिनीत गंधक तर निव्वळ जास्त सामूच्या जमिनीत जिप्सम चा वापर अवश्य करावा.
- आच्छादनाचा वापर (सेंद्रिय/प्लास्टिक) केल्याने खालील फायदे होतात:
- जमिनीचे तापमान कमी ठेवते.
- सूक्ष्म जीवांच्या वाढीस चालना मिळते.
- जमिनीतील बाष्पीभवन कमी होते.
- खोडा जवळ तणांची वाढ होत नाही.
सिंचन व्यवस्था
- योग्यवेळेस सिंचन करणे महत्त्वपूर्ण असते. जमिनीतील एकूण उपलब्ध पाण्याचे प्रमाण 35% कमी झाल्यानंतर सिंचन करणे गरजेचे आहे.
- जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता, मुळांची खोली आणि बाष्पीभवनांच्यावेगा नुसार वारंवार सिंचन करावे.
- क्षारयुक्त जमीन व सोडियमचे जास्त प्रमाण असल्यास पालाशच्या शोषणास बाधा येते.
- ठिबकच्या तोट्या सुरुवातीला केळीपासून ०.५-१.० फुट दूर असाव्यात, तीन महिन्यांनी त्यांना १-१.५ फूट आणि सहा महिन्यांनंतर केळीपासून २ फुट दूर ठेवावे.
- ठिबक चा कार्यक्षम वापर होण्यासाठी पाणी परीक्षण (पाण्याचा सामू, ईसी, टीडीएस आणि कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, लोह आणि इतर घटक) तसेच जमिनीचे भौतिक गुणधर्म, (जमिनीचा पोत, पाणी धारण क्षमता, पाणी मुरण्याचे प्रमाण) याबाबत माहिते घेणे अत्यावश्यक आहे.
- केळीसाठी इष्टतम भिजवण क्षेत्र: (झाडाभोवती ओले होणारे क्षेत्र)
- ० ते ५० दिवस - ६० सें.मी.व्यास
- ५१ ते १०० दिवस - ९० सें.मी. व्यास
- १०१ ते १५० दिवस - १२० सेंमी. व्यास
- १५१ ते काढणी पर्यंत - १८० सें.मी. व्यास
केळी ठिबक सिंचन व्यवस्था
एक लॅटरल: तोटी चे अंतर: २' X २ ; पाणी विसर्ग क्षमता: ८ लिटर प्रति तास
दोन लॅटरल: तोटी चे अंतर: २' X २ ; पाणी विसर्ग क्षमता: ४ लिटर प्रति तास
घड व्यवस्थापन पद्धती
- पाने काढून टाकणे: (रोगग्रस्त पाने आणि स्वच्छता);
- घडांना घासणारी पाने काढावीत.
- हवा खेळती राहण्यासाठी व निरोगी वातावरणासाठी अति पिकलेली आणि रोगग्रस्त पाने काढावीत.
- केळीच्या टोकाकडील फुलांचा वाळलेला भाग काढून टाकणे. (यामुळे फळांना होणारी हानी तसेच बुरशी व कीटकांचा हल्ला कमी होतो.)
- घडाला फवारणी : अ. अन्नद्रव्ये (प्रति पंप ):
- ३० मिली अमीन ऑल + ३० मिली सी रिच + 3 मिली ब्रेक-थ्रू एस 240 + ३० ग्रॅम बाविस्टीन.
- २० मिली झिंकफ्लो + २० मिली लिक्वीबोर + ३० ग्रॅम M ४५
- १५ मिली हायक्लास + ३० मिली के १० प्लस.
- बॅगिंग केले नसल्यास, हे स्प्रे 4-6 वेळा पुनरावृत्ती करता येते.
- आणि किंवा घडाला इंजेक्शन देणे.
- नर फुलं असेलेले केळ फुल काढणे (शेवटची फणी विकसित झाल्यावर एक महिन्यानंतर).
- बॅगिंग (कीटकांपासून संरक्षण आणि केळींना होणारे नुकसान टाळण्यासाठी, शेवटची फणी उघडल्यावर 15 दिवसांच्या आत बॅगिंग करावे)
- निळ्या रंगाची 200 सेमी लांबी - 250 सेमी रुंद बॅग वापरावी.
- बॅगिंग मुळे परिपक्वता 7-10 दिवस लवकर घडून येते.
- रोगाच्या संसर्गाचा सूचक म्हणून शेवटच्या फणी खाली 1 किंवा 2 केळी ठेवणे
- टॅग करणे: परिपक्व तेची तारीख जाणून घेण्यासाठी. विशिष्ट रंगाची रिबीन बांधणे.
बॅगिंग |
निर्यातीसाठी आवश्यक गुणवत्ता.
- एकसमान केळी मिळण्यासाठी एका घडामध्ये फक्त 9 -10 फण्या ठेवाव्यात.
- फळ काढणीच्या दोन आठवडे आधी, घडाच्या दुसऱ्या फणीच्या केंद्रातील केळ्याचा व्यास 41 मिमी आणि शेवटच्या फणी मधली केंद्राच्या केळ्याचा 35 मि.मी. व्यास असावा.
लिबिगचा नियम: पिकाला सर्व अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात पुरवली, परंतु एखादे अन्नद्रव्ये कमी पडले तर त्या अन्नद्रव्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट होते.
सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात या चौकटीवर क्लिक आहे त्यावर क्लिक करा. नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल.
लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.
Comments
Post a Comment