ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा वापर, फायदे व तोटे (लेख क्रमांक २८)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक, 
इको ऍग्रो ग्रुप, पुणे

कॉपर सल्फेट, कॉपर ऑक्सीक्लोराइड, कॉपर हाइड्रोक्साइड व इतर ताम्र युक्त बुरशीनाशके, जगभरातील शेतकर्यांकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पेस्टीसाईड पैकी प्रमुख आहेत. द्राक्ष पिकामध्ये डाऊनी मिल्ड्यू पासून संरक्षणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर १८८२ पासून केला जातो.

ताम्रयुक्त औषधे ८० हून अधिक वनस्पतीजन्य रोगांसाठी वापरले जातात. ताम्र हे बुरशी, जीवाणू, शेवाळ या सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवांसाठी घातक आहे. ताम्राचा संयोग बुरशी, जीवाणू अथवा वनस्पतीच्या पेशींमधील प्रथिनांशी झाल्याने रोगजन्य व काही अंशी निरोगी पेशी मारल्या जातात. वारंवार /  जास्त प्रमाणात ताम्रयुक्त संयुगांच्या वापराने पानांची कार्यक्षमता कमी होते व पाने लवकर झडतात. बोर्डो मिश्रणा मधील चुन्याचे काम हे तांब्याचे, वनस्पती पेशीवरील हानिकारक परिणाम कमी / निष्प्रभ करण्याचे आहे. साधारणपणे ताम्रयुक्त औषधे वनस्पतीला उत्तमरित्या चिकटतात, पावसाने धुतले जात नाहीत. यामुळे ताम्रयुक्त औषधे अधिक काळापर्यंत कार्यशील राहते, पण त्याच बरोबर पाने व वनस्पतीचे इतर भाग जेव्हा छाटले/गळून पडतात त्यावेळेला त्यावरील ताम्र जमिनींवर पडते. 

जमिनीतील ताम्राची वाढती पातळी हि अनेक ठिकाणी चिंतेचा विषय आहे. ताम्र हा जड धातू (Heavy metal) आहे त्यामुळे ताम्रयुक्त बुरशी नाशकांचे/ संयुगांचे जैव विघटन दीर्घकाळ होत नाही. ताम्रयुक्त संयुगे जलचरांसाठीसुद्धा खूप हानिकारक आहेत. जमिनीतून निचऱ्या सोबत ताम्र पदार्थ जलवाहिन्यात प्रवेश करतात तेव्हा जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते. ताम्र हे जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी सुद्धा घातक आहे. ताम्राची अधीक पातळी असलेल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांचा अधिवास धोक्यात येतो व इतर जमिनींच्या तुलनेत सूक्ष्मजीव कमी प्रमाणात आढळून येतात. या शिवाय जमिनीमध्ये उच्च पातळीमध्ये ताम्र उपलब्ध असले तर ते इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम करते. 

ताम्रयुक्त बुरशी नाशकांचा/ संयुगांचा वापर अथवा जमीन, पाणी इत्यादी मधून होणारा संसर्गाचा मानवी आरोग्यावरती घातक परिणाम होतो. सन २०१८ पासून युरोपियन समुदायाने मानवी आरोग्य व पर्यावरणाच्या संरक्षणार्थ ताम्राचा वापर कमीत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन केमिकल एजेन्सी ने ताम्र हे कर्करोगजन्य आहे असा निर्वाळा दिला आहे (विशेषत: मुत्रापिंडाचा). याशिवाय उष्ण कटीबंधातील मध माश्यांसाठीहि ताम्र युक्त संयुगे घातक असल्याचे दिसून येते. (ब्राझील मधील अभ्यास)   

जगात काही ठिकाणी नैसर्गिक स्वरुपात कॉपर सल्फेट सापडते व त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा वापर केला जातो. उपलब्ध असलेले बहुतांशी ताम्रयुक्त संयुगे हि उत्पादन केली जात असल्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये वापरता येत नाहीत. मात्र सेंद्रिय उत्पादकांना "इतर कोणताही पर्याय नसेल तर, कृत्रिम ताम्र युक्त बुरशी नाशकांचा वापर त्यांना करता येतो".  अनेक वेळेला ताम्रयुक्त बुरशी नाशके वापरली नाहीत तर सेंद्रिय पीक हाताचे जाईल अशी परिस्थिती असते.   

युरोपियन समुदायाने सर्व प्रकारच्या शेतीसाठी ताम्रयुक्त संयुगांचा उपयोग जास्तीत जास्त १.६ किलो/एकरी/वर्षी इतकाच निर्धारित केला आहे. वर्षानुवर्षे सतत होणाऱ्या ताम्रयुक्त संयुगांचा वापरामुळे जमिनीतील ताम्राची पातळी जी ५० ppm पर्यंत असावी ती अतिशय जास्ती असल्याचे दिसून येते. (विशेषत: द्राक्ष बागांच्या ठिकाणी).

  • स्लोव्हेनियातील जुन्या द्राक्ष बागा:  ३०० ppm हून अधिक
  • फ्रांस मधील द्राक्ष बागा: १०० ppm तर काही ठिकाणी १००० ppm
  • मध्य इटली मधील द्राक्ष बागा: ४० ppm ते २२० ppm
  • मध्य चिली मधील द्राक्ष बागा: १६२ ppm ते ७५१ ppm

ताम्रयुक्त संयुगांना अनेक पर्यायी रासायनिक बुरशी नाशके उपलब्ध झाली व होत आहेत. मात्र, लवकर निर्माण होणारी प्रतिकार शक्ती तसेच MRL च्या दृष्टीकोनातून वापरण्याची मर्यादित संधी, तुलनेने महाग असणे अशा अनेक कारणामुळे आजही ताम्रयुक्त बुरशी नाशके हि शेतकऱ्यांच्या पसंतीस असून त्यांचा अवश्य वापर केला जातो. परंतु, जमीनीतील सूक्ष्मजीवांवरती होणार परिणाम, मनुष्य स्वास्थ्यावरती होणारा परिणाम या बाबींकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.  ताम्रयुक्त संयुगांना खालील तक्त्यात दिल्या प्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा सुयोग्य वापर करून ताम्रयुक्त औषधांचा कमीत कमी वापर करणे शक्य आहे.  

सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments

  1. खुप छान माहीती

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय बद्दल धन्यवाद. आपण जर ब्लॉग ला follow केले तर आपल्याशी संपर्क ठेवता येईल.

      Delete
    2. अभिप्राय बद्दल धन्यवाद, आपण जर ब्लॉग ला subscribe केले तर आपल्याशी संपर्क ठेवता येईल.

      Delete
  2. सर याप्रमाणेच इतर ही विशेषत strobulirin ग्रुप मधील बुरशीनाशकांचा वाढता वापर याविषयी सविस्तर विवेचन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय बद्दल धन्यवाद. आपली सूचना विचारात घेतली आहे.

      Delete

Post a Comment