ब्रिक्स (लेख क्रमांक २७)

 श्री रवींद्र थत्ते, 
संचालक,
इको ऍग्रो ग्रुप, पुणे

ब्रिक्स हे साखरेचे पाण्यामधील प्रमाण दर्शविण्याचे परिमाण आहे. १ डिग्री ब्रिक्स (oBx) म्हणजे १०० ग्रॅम शुद्ध पाण्यामध्ये १ ग्रॅम शुद्ध सुक्रोस. जर्मन शास्त्रज्ञ एडॉल्फ ब्रिक्स याने हे परिमाण शोधले.     

फळांच्या रसामध्ये निव्वळ सुक्रोस नसून ग्लुकोस, फ्रुक्टोस व इतर शर्करा, जीवनसत्वे, खनिजे तसेच प्रथिने असल्यामुळे रसाचा ब्रिक्स मोजला तर ब्रिक्सच्या व्याखेप्रमाणे फक्त सुक्रोस दाखवत नाही. परंतु हे निव्वळ सुक्रोसच्या जवळपास येणारे प्रमाण असल्यामुळे काढणीपुर्वी आणि काढणी पश्चात फळांची पक्वता / गोडी मोजण्यासाठी, जगभरात जगभरात ब्रिक्स (oBx) हे परिमाण सगळीकडे वापरले जाते.

ब्रिक्स म्हणजे गोडी हे समीकरण फक्त काही गोड फळ पिकांसाठी बरोबर आहे. इतर पिकांमध्ये विशेष गोडी येत नाही, तेथे ब्रिक्स हे TSS दर्शवतात. ब्रिक्स म्हणजेच रसाच्या वजनामधील घन पदार्थांचे प्रमाण (%) = ज्याला आपण TSS (Total Soluble solids – एकूण विद्राव्य घटक) असे देखील म्हणू शकतो. जास्त TSS म्हणजे त्या रसामध्ये जास्त घन पदार्थ, जास्त खनिजे आहेत हे उघड आहे. टोमॅटोचे केचप करायचे असले तर जास्त TSS असलेला टोमॅटो तुम्हाला उपयोगाचा आहे, नुसता मोठा व लाल टोमॅटो कामाचा नाही. हीच गोष्ट सर्व भाज्या व फळांसाठी लागू आहे. काही देशांमध्ये विविध पिकांची प्रतवारी हि ब्रिक्स वर केली जाते. प्रक्रीयासाठी खरेदी करण्याऱ्या मालामध्ये ब्रिक्स तपासण्याची पद्धत सर्वमान्य आहे.

आपण जे अन्न खातो त्यामधून प्रती १०० ग्रॅम किती मिलीग्रॅम खनिजे आहेत हे महत्वाचे आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, क्रोमियम, आयोडीन इत्यादी खनिजांचा या मध्ये समावेश आहे. शरीराला हि खनिजे पुरेश्या प्रमाणात मिळाली नाहीत, तर भरपूर खाऊन व खाद्यातून प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्वे मिळूनसुद्धा कुपोषण होऊ शकते व अनेक आजार उदभवतात.

जितके जास्ती ब्रिक्स, तितकी जास्त गोडी व उत्तम स्वाद/चव. उदा: आंबट द्राक्षामध्ये साखरेचे प्रमाण १०-१२ असू शकते, तर उत्तम गोडी असलेल्या द्राक्षामध्ये २४ ब्रिक्स असू शकतात. वनस्पती, फळे/भाजी जोमदार वाढून  पक्व होऊ लागतात, त्या वेळेला त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. हीच गोष्ट भाजीपाल्यातहि दिसून येते. डॉ. कॅरी रीम्स तसेच अनेक शास्त्रज्ञांचे असे मत आहे कि अधिक ब्रिक्स असलेल्या वनस्पती, फळे/भाजी हि कीड-रोगाला बळी पडत नाही म्हणूनच फळ/भाज्यांची पक्वता व गुणवत्ता तपासण्यासाठी ब्रिक्स मीटरचा वापर केला, तर तो फायदेशीर ठरतो. अनेक प्रयोगशील शेतकरी त्यांचे पिक, रोग व किडींना प्रतिकार करण्यास सक्षम आहे का ? हे बघण्यासाठी ब्रिक्सची मोजदाद करतात. डॉ. कॅरी रीम्स यांनी फळे व भाज्यांच्या प्रकारानुसार, त्यातील ब्रिक्सच्या प्रमाणाचे वर्गीकरण खराब, साधारण, चांगला किंवा उत्तम असे केले आहे.

डॉ. कॅरी रीम्स (१९०३-१९८५) यांनी गणित, जैव भौतिकी, जैव रसायनशास्त्र याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी मानवी आरोग्य, वनस्पतींची वाढ, ऊर्जा, प्राण्यांचे आरोग्य, पोषण विषयक आणि जमिनीचे पुनुरुत्पादन या क्षेत्रांत बरेच शोध लावले. केलेल्या प्रयोगावरून त्यांनी अनुमान काढले कि, जेव्हा ब्रिक्स वाढतात त्या वेळेला वनस्पतीमधील खनिजांचे प्रमाण हि वाढलेले असते. वनस्पतीतील पानांतील रसाचे (plant sap) एक किंवा दोन थेंब रिफ्रेक्टोमीटरच्या काचेवर टाकून नोंद घेणे इतके हे सोपे आहे. साधारणपणे जो वनस्पतीचा जो भाग आपण खातो त्या भागातील रसाचा ब्रिक्स मोजायचा असतो. म्हणजे गाजराचे ब्रिक्स काढताना आपण पानातील रसाचा ब्रिक्स मोजणार नाही.

पिकाचे ब्रिक्स समाधानकारक नसले, तर पानांवाटे पिकास आवश्यक खनिजे / पोषक द्रव्ये देऊन पोषक घटकांनी समृद्ध खाद्यपदार्थांची निर्मिती करू शकतो. 

डॉ. कॅरी रीम्स यांनी विकसित केलेली ब्रिक्स मोजमापाची वर्गवारी खाली दिलेली आहे.

 

फळ

ब्रिक्सची पातळी

खराब

साधारण

चांगली

उत्तम

सफरचंद

१०

१४

१८

केळी

१०

१२

१४

नारळ

१०

१२

१४

द्राक्षे

१२

१६

२०

लिंबू

१२

मोसंबी

१०

१२

आंबे

१०

१४

संत्री

१०

१६

२०

अननस

१२

१४

२०

२२

पपई

१०

१८

२२

टोमाटो

१२

कलिंगड

१२

१४

१६

स्ट्रॉबेरी

१०

१४

१६

बेदाणा

६०

७०

७५

८०


 

भाजीपाला

ब्रिक्सची पातळी

खराब

साधारण

चांगली

उत्तम

कोबी

१०

१२

बीट

१०

१२

ढोबळी मिरची

१२

मिरची

१०

चवळी

१०

१२

वाटाणे

१०

१२

गाजर

१२

१८

फुलकोबी

१०

काकडी

१२

लसूण

२८

३२

३६

४०

कांदे

१०

भुईमुग

१०

बटाटा

रताळे

१०

१४

मधु मक्याचे कणीस

१०

१८

२४


दोन ठिकाणच्या फरसबीच्या शेंगातील पोषण मूल्यांबद्दल केलेले तुलनात्मक विश्लेषण खालील तक्त्यात दिलेले आहे.

तपशील

मार्केट मधून खरेदी केलेली ताजी फरसबी

उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील ताजी फरसबी

ब्रिक्स

४.२

६.१

शुष्क पदार्थ

८.१%

१६.६%

सामू (pH)

५.५

६.४

प्रथिने (ग्रॅम)

१.७६

३.३४

तांबे (मिलीग्रॅम)

०.१

०.४

लोह (मिलीग्रॅम)

१.३

२.१

जस्त (मिलीग्रॅम)

०.७२

२.३

मॅंगनीज (मिलीग्रॅम)

०.२९

०.३५

कॅल्शियम (मिलीग्रॅम)

७०

१३०

मॅग्नेशियम (मिलीग्रॅम)

३०

५०

फॉस्फरस (मिलीग्रॅम)

४०

८०

पोटॅशियम (मिलीग्रॅम)

१९०

५८०

चव

बेचव

चवदार

संदर्भ: हाई ब्रिक्स गार्डन (https://www.highbrixgardens.com/nutrient-dense-foods.html)

शेतीमध्ये ब्रिक्सच्या मोजमापाने व्यवस्थापकीय निर्णय घेणे सोपे होते उदा: पाणी व खते  देण्याची वेळ, माल काढणीसाठी योग्य वेळ, मालाचे काढणी पश्चात व्यवस्थापन. फळामधील गोडी व घनता दर्शवण्याशिवाय, ब्रिक्स हे पिकाच्या आरोग्याचे द्योतक आहे. ब्रिक्सचे मोजमाप हे तापमानाला संवेदनशील असून. २० डिग्री सेंटीग्रेडलाच ब्रिक्सचे प्रमाण अचूक येते. म्हणूणच स्थानिक तापमानाला जुळवून घेणारे रिफ्रेक्टोमीटर पाहिजे (Temperature adjusted). झाडावरील फळांमधील ब्रिक्सचे प्रमाण दिवसाच्या वेळेनुसार बदलू शकते, त्यामुळे  ब्रिक्सचे माजोमाप नेहमी दिवसाच्या एकाच वेळी घ्यावे. घडातील/झाडावरील फळ कोणत्या भागात आहे या नुसार देखील फरक पडतो. त्यामुळे मोजमापाच्या जागेमध्ये सुद्धा सातत्य पाहिजे.

फळ व भाज्यांमधील ब्रिक्स ची पातळी अनेक घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये पिकाचा वाण, पिकाची पक्वता, जमिनीतील पाण्याची, अन्नद्रव्यांची उपलब्धता, तापमान व सूर्यप्रकाश यावर अवलंबून असतात. पक्वतेची अवस्था हा पिकामध्ये जनुकीय गुणधर्मानुसार निश्चित असतो. हवामानात मोठे बदल झाले तरच त्यात बदल होतो. फळ पूर्ण पक्वतेच्या आधी काढले तर, त्यामध्ये चव/स्वाद, वास, रंग व गोडी यासाठी आवश्यक घटकांची निर्मिती झालेली नसते व फळाचा दर्जा चांगला मिळत नाही. सर्वसाधारणपणे, पक्वतेच्या अवस्थेमध्ये TSS व साखरेचे प्रमाण वाढते तर ॲसीडचे प्रमाण कमी होते.

काही पिकांमध्ये (climacteric) पिष्टमय पदार्थांचे साखरेमध्ये रुपांतर हि क्रिया फळ काढणी नंतर चालू राहते. अशी फळे माल काढल्यानंतर पक्व होतात. पूर्ण पक्वतेला माल काढला तर काढणी पश्चात हाताळणीमध्ये फळाचा दर्जा खराब होतो. अशा फळांमध्ये पक्वता दर्शवणारे इतर बाबींचा वापर करून काढणी केली जाते. उदा: आंबा, केळी, पपई, चिकू, पेरू, अंजीर, सफरचंद ई.

काही फळे झाडावरच १००% पक्व होतात. (उदा: द्राक्षे, संत्री, मोसंबी, डाळिंब, लीची, स्ट्रॉबेरी, कलिंगड ई.) त्यांच्यामध्ये फळांचा आकार व गोडी वाढायची थांबते त्यावेळेला, जर फळ काढले नाही तर त्यांच्या वजनात घट येते. त्यामुळे ब्रिक्सचे प्रमाण वारंवार तपासून मालाची काढणी केली तर फायद्याचे ठरते.

व्हरायसन नंतर द्राक्ष पिकामध्ये मण्यांचे वजन, आकार व साखरेचे प्रमाण वाढते. पीकाला मिळालेले डिग्री दिवस, तापमान, घडांची संख्या, खत–पाणी–अन्नद्रव्य व PGR व्यवस्थापन व जातीच्या गुणधर्मानुसार पक्वता येते. माल कधी काढायचा? हा निर्णय बहुतांश बाजारातील मागणी, भाव या बाबींवरच आधारित असतो. परंतु खालील आकृती १ मध्ये दाखवल्या प्रमाणे आकार, वजन व गोडी याचे शिखर गाठल्यानंतर द्राक्ष मण्यांतील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते (म्हणजेच वजन कमी होऊ लागते). वजन कमी झाल्यामुळे शर्केरेचे प्रमाण वाढते. खाण्याच्या द्राक्षाला भाव गुणवत्ता व वजनावर मिळत असल्यामुळे वजन घटले तर नुकसान होऊ शकते. पद्धतशीरपणे ब्रिक्स मीटरचा वापर केला तर निश्चितच फायदा होऊ शकतो. 

पाण्याच्या उपलब्धतेचा देखील ब्रिक्स वरती मोठा परिणाम होतो. फळ वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याची कमतरता असली तर फळाचे वजन वाढत नाही पण TSS वाढतो. उत्तम पाणी व खत व्यवस्थापनाने चांगले ब्रिक्स मिळू शकतात. 

आकृती १
रिफ्रेक्टोमीटर या उपकरणाची अंतर्गत रचना व कार्यापद्धती:

आकृती २

आकृती ३: प्रिझम आधारित रिफ्रेक्टोमीटरच्या काचेवर द्रावणाचे थेंब ड्रॉपर ने टाकावेत.

आकृती ४: प्रिझम मधून परावर्तीत होणाऱ्या प्रकाशामध्ये गडद व फिक्का असे दोन भाग दिसतात. उपकरणातील मोजमापाच्या पट्टीने गडद व फिक्क्या भागाची सीमा जेथे असते तेवढे ब्रिक्स असे धरले जाते. वस्तुत: द्रावणामध्ये किती प्रमाणात घन पदार्थ विरघळले आहेत हे दर्शवले जाते. 
 

आकृती ५: फक्त साखरेचे प्रमाण दर्शवणारे डिजिटल ब्रिक्स मीटर

मधाचे ब्रिक्स मोजण्यासाठी वेगळ्या प्रकारचे, प्रिझम आधारित रिफ्रेक्टोमीटर वापरावे लागते. यामध्ये मधातील पाण्याचे प्रमाण शोधले जाते व त्यावरून साखरेचे प्रमाण. मधाच्या गुणवत्तेमध्ये त्यातील पाण्याचे प्रमाण हा अत्यंत महत्वाचा समजाला जातो. मधुमक्षिका पालक / मधाचे व्यापारी याचा वापर नेहमी करतात.

फळांमधील रस काढणे फारसे अवघड नाही परंतु भाजीपाल्यासाठी जास्ती दाब दिला जाईल असे उपकरण (उदा: स्क्रू प्रेस – आकृती ६ किंवा कमी ताकतीचा हाताने दाबायचा साधा प्रेस - आकृती ७) घेऊन त्यातून निघणारे काही थेंब रिफ्रेक्टोमीटर वर घ्यावे. या काढलेल्या रसाचा वापर ब्रिक्सचे प्रमाण काढण्यासाठी तसेच पान – देठ परीक्षणा प्रमाणे वनस्पतीला मिळणारे खनिजे व इतर अन्न द्रव्यांचे प्रमाण मोजण्यासाठी करता येतो. आयन संवेदनशील मीटर या छोट्या पेन सारख्या उपकरणांचा वापर करून रसामधील (plant sap) नायट्रेट नत्र, पालाश, सोडियम, कॅल्शियम, सामू आणि विद्युत वाहकतेचे प्रमाण शेतामध्ये तत्काळ तपासता येते. 

आकृती ६: खूप जास्त दाब निर्माण करणारे उपकरण  


आकृती ७: कमी ताकतीचा हाताने दाबायचा साधा प्रेस. 


सदर लेखमालेतील लेख आवडला असल्यास इतरांना या लेखाची लिंक पुढे पाठवा तसेच या ब्लॉगला फॉलो (Follow) करा. Follow करण्यासाठी https://ecoagroservices.blogspot.com/ या लिंकला जा व पान उघडा. पानाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात  या चौकटीवर क्लिक आहेत्यावर क्लिक करा.  नवीन लेख प्रकाशित होताच त्याची सूचना तुम्हाला ई-मेल द्वारे प्राप्त होइल

लेखाबाबत काही प्रश्न / सूचना असल्यास आपण ecoagropune@gmail.com या ई-मेलच्या माध्यमातून आम्हाला पाठवू शकता.

Comments

  1. द्राक्श पिकात स्टेजनुसार पानाच्या ब्रिक्सची माहीती द्या.
    तसेच वांगी,कारले ची माहीति हविय.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्राय बद्दल धन्यवाद. आपण जर ब्लॉग ला follow केले तर आपल्याशी संपर्क ठेवता येईल.

      Delete

Post a Comment